तिघाच आमदारांकडून शंभर टक्के निधीचा वापर

By Admin | Updated: September 4, 2014 02:46 IST2014-09-04T02:46:15+5:302014-09-04T02:46:15+5:30

मुंबई शहरांतर्गत येणा:या 1क् विधानसभा मतदारसंघातील 9 आमदारांनी आमदार निधीचा 9क् टक्क्यांहून अधिक वापर केल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे.

Use of 100% funds from MLAs | तिघाच आमदारांकडून शंभर टक्के निधीचा वापर

तिघाच आमदारांकडून शंभर टक्के निधीचा वापर

चेतन ननावरे - मुंबई
मुंबई शहरांतर्गत येणा:या 1क् विधानसभा मतदारसंघातील 9 आमदारांनी आमदार निधीचा 9क् टक्क्यांहून अधिक वापर केल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. त्यात 3 आमदारांनी एकूण निधीचा वापर 1क्क् हून अधिक कामे करण्यासाठी केल्याची माहिती आहे.
शहराच्या जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदारांना 2 कोटी रुपयांचा आमदार निधी मिळतो. त्यात पहिली चार वर्षे त्यांना मिळणा:या एकूण निधीच्या दीडपट रकमेइतपत कामांचे प्रस्ताव सादर करता येतात. त्यांना मंजुरीही मिळते. मात्र शेवटच्या वर्षी केवळ 2 कोटींचा निधी मंजूर करण्यात येतो. त्यात मागील वर्षातील अपूर्ण कामांसाठी लागणारा निधी वगळून उरलेली रक्कम आमदार निधीत जमा करण्यात येते. मात्र शेवटच्या वर्षी आमदारांना मिळणारा हा निधी आचारसंहिता लागण्याआधी खर्च करणो अपेक्षित असते. नाहीतर तो निधी पुन्हा शासन तिजोरीत जमा होतो.
अशा प्रकारे मुंबई शहरातील 9 आमदारांनी 2क्14-15 सालासाठी मिळालेल्या निधीतील 9क् टक्क्यांहून अधिक निधीच्या कामांचे प्रस्ताव नियोजन समितीकडे सादर केले आहेत. त्यातील आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार मधू चव्हाण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी एकूण 1क्क् हून अधिक कामांसाठी 95 टक्क्यांहून अधिक निधी खर्च केला आहे. लोढा यांनी विविध 124 कामांसाठी, चव्हाण यांनी 114 कामांसाठी तर अहिर यांनी 1क्1 कामांसाठी निधी खर्च केला आहे.
जगन्नाथ शेट्टी उदासीन
सायन-कोळीवाडा मतदारसंघाचे आमदार जगन्नाथ शेट्टी यांना या वर्षीही 2 कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यातील मागील वर्षीच्या प्रस्तावित कामांसाठी अपूर्ण पडणारा 37 लाख 17 हजार रुपयांचा निधी कपात करण्यात आला. त्यातून या वर्षी मतदारसंघात खर्च करण्यासाठी शेट्टी यांच्याकडे 1 कोटी 62 लाख 83 हजार रुपयांचा निधी उपलब्ध होता. मात्र शेट्टी यांनी त्यातील केवळ 48 लाख 44 हजार रुपयांच्या निधीचा प्रस्तावित खर्च सादर केला आहे. तर उरलेले 1 कोटी 14 लाख 39 हजार रुपये सरकारी तिजोरीत पडून आहेत. परिणामी आचारसंहिता जाहीर होण्याआधी हा निधी खर्च केला नाही, तर सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे. समितीच्या माहितीनुसार, शेट्टी यांनी विभागात सीसीटीव्ही लावण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला होता. मात्र शासन नियमाबाहेर असलेला प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. शिवाय पर्यायी प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. मात्र 2 सप्टेंबर्पयत तरी शेट्टी यांनी कोणताही प्रस्ताव सादर केलेला 
नाही.
 
मतदारसंघ  कामांसाठी मंजूर निधीशिल्लक निधी 
कुलाबा  1 कोटी 46 लाख 72 हजार6 लाख 35 हजार
मुंबादेवी  1 कोटी 9क् लाख 98 हजार7 लाख 2क् हजार
मलबार हिल  1 कोटी 99 लाख 93 हजार7 हजार
भायखळा  1 कोटी 95 लाख 9क् हजार4 लाख 1क् हजार
शिवडी  1 कोटी 25 लाख 45 हजार1 लाख 5 हजार
वरळी  1 कोटी 99 लाख 72 हजार28 हजार
माहीम  1 कोटी 76 लाख 71 हजार17 लाख 71 हजार
वडाळा-सायन  1 कोटी 29 लाख 13 हजार6 लाख 87 हजार
कोळीवाडा  48 लाख 44 हजार1 कोटी 14 लाख 39 हजार
धारावी  1 कोटी 73 लाख 36 हजार5 लाख 23 हजार
 

 

Web Title: Use of 100% funds from MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.