मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघ मंदिराच्या पंचवार्षिक निवडणुकीत नियामक मंडळात ऊर्जा पॅनेलचा आवाज घुमला. ऊर्जा पॅनेलचे ३५ पैकी २५ सदस्य निवडून आले, तर भालेराव विचार मंच पॅनलचे १० सदस्य निवडून आले. तसेच अध्यक्षपदी ऊर्जा पॅनेलच्या डॉ. उषा तांबे यांनी बाजी मारली. मराठी साहित्य संघ मंदिराच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर होण्यास रविवार उजाडला. या निवडणुकीत उपाध्यक्षपदी ऊर्जा पॅनेलचे ५ सदस्य विजयी झाले.
भालेराव विचार मंच पॅनलच्या दोघांनी बाजी मारली. तसेच ऊर्जा पॅनलचे ३१ उमेदवार विविध पदांवर विजयी झाले. भालेराव विचार मंच पॅनलच्या उमेदवारांना १२ पदांवर विजय मिळविता आला.
आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणूक गाजली आरोप प्रत्यारोपांची राळ उडाल्याने यंदाची निवडणूक चांगलीच गाजली. या निवडणुकीत नियामक मंडळावर ऊर्जा पॅनलचे ज्ञानेश पेंढारकर, मोनिका गजेंद्रगडकर, चंद्रशेखर गोखले, प्रतिभा सराफ, प्रियांका बांदिवडेकर, एकनाथ आव्हाड आदी निवडून आले. भालेराव विचार मंच पॅनलचे प्रमोद पवार, चंद्रशेखर वझे, विजयराज बोधनकर, प्रकाश कामत, चंद्रकांत भोंजाळ यांनी विजय मिळवला.