उरणमध्ये ट्रेलरच्या धडकेने पाइपलाइनला फुटली
By Admin | Updated: March 31, 2015 22:22 IST2015-03-31T22:22:53+5:302015-03-31T22:22:53+5:30
आधीच अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने पाण्याची चोरी होत असताना त्यात लाखो लिटर पाण्यालाही गळती लागलेली आहे. एका ट्रेलरने पाइपलाइनला मंगळवारी धडक

उरणमध्ये ट्रेलरच्या धडकेने पाइपलाइनला फुटली
उरण : आधीच अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने पाण्याची चोरी होत असताना त्यात लाखो लिटर पाण्यालाही गळती लागलेली आहे. एका ट्रेलरने पाइपलाइनला मंगळवारी धडक दिल्याने पाइप फुटून जास्तच पाणी वाया गेल्याने उरणच्या रहिवाशांना आता दुष्काळाचा सामना करावा लागणार की काय, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळी ११ च्या सुमारास चिरनेरहून खारपाड्याकडे जाणाऱ्या एका कंटेनर ट्रेलरने (एमएच-०६ के-५४४९) पलटी खाल्ल्याने या पाइपलाइनचा व्हॉल्व तुटला. यामुळे १ मीटर व्यासाच्या पाइपलाइनमधून लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने येथे नागरी वस्ती नसल्याने मोठे नुकसान झाले नाही. हे पाणी शेतातून थेट खाडीला मिळाले, असे असले तरी या पाण्यामुळे शेती असणाऱ्या वीटभट्ट्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळी ११ वाजता ही घटना घडल्यानंतर एका तासाने या पाइपलाइनचे पाणी बंद करण्यात आले. दुपारी ४ वाजेपर्यंत या पाण्याच्या व्हॉल्ववरील कंटेनर उचलला नसल्याने पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हेटवणे पाइपलाइनवरील गावांना मंगळवारी पाणी मिळणार नसल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)