मुंबई - ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही विकत घेतले आहे का,’ अशा आशयाच्या वक्तव्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर गुरुवारी पुन्हा अडचणीत आल्या. या वक्तव्याबद्दल पेडणेकर यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, मात्र त्यांनी माफी न मागितल्यामुळे महापौर रितू तावडे यांनी सभागृह तहकूब केले. त्यानंतर सभागृहाबाहेर पेडणेकरविरुद्ध सत्ताधारी असा सामना रंगला. शिंदेसेनेचे गटनेते अमेय घोले, उपमहापौर संजय घाडी यांनी पत्रकार परिषदेत घेत पेडणेकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
दिवंगत आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी महापौरांना दुसऱ्या रांगेत बसविले होते. हा एकप्रकारे त्यांचा अवमान होता, असा आक्षेप घेत उद्धवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावर महापौरांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. पालिका सभागृहातही महापौरांचा मान राखावा, असा विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावत सभागृह नेते गणेश खणकर यांनी राऊत यांच्या मुद्द्याला समर्थन दिले.
पेडणेकर यांनी, आमच्यावर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार झाले आहेत, काहींनी बाळासाहेबांना विकत घेतले आहे का, असे तथाकथित वक्तव्य केले आणि वादाला सुरुवात झाली. या वक्तव्याबद्दल पेडणेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. परंतु, त्यांनी माफी न मागितल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडताच तो महापौरांनी मंजूर केला.
शिवसेनाप्रमुख हे संपूर्ण देशवासीयांसाठी वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांना विकत घेण्याची भाषा करू नका, असे सत्ताधारी भाजप व शिंदेंसेनेच्या नगरसेवकांनी ठणकावले. यावेळी महापौरांनीही पेडणेकर यांना माफी मागण्याचा आदेश दिला. मात्र पेडणेकर यांनी नकार दिला.
महापौरांकडे निलंबनाची मागणी करणारपेडणेकर यांच्या वक्तव्यामुळे पालिका अधिनियमांतर्गत त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी आपण महापौरांकडे करणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले.
‘मी असे बोललेच नाही’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबाबत मी असे वक्तव्य केलेच नाही. भाजपने माझ्या विधानाचा सोयीस्कर अर्थ लावला. त्यामुळे माफी का मागावी, असा सवाल पेडणेकर यांनी केला.
सभागृहाचे कामकाज १० मिनिटे तहकूबपेडणेकर या काही कामासाठी सभागृहाच्या बाहेर जाण्यास निघाल्या. त्यावेळी महापौर आणि भाजप सदस्यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र, पेडणेकर बाहेर निघून गेल्या. पेडणेकर सभागृहात येऊन माफी मागत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू करणार नसल्याचा इशारा देत महापौरांनी सभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर कामकाज पूर्णवेळ तहकूब केले.
वक्तव्य चुकीचे : महापौरपेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुखांबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे असून, ते सभागृहाच्या रेकॉर्डवर आले आहे. त्यांचे वक्तव्य हे राजकीय स्तर घसरल्याचे द्योतक आहे, अशी टीका महापौर रितू तावडे यांनी केली.
सभागृहात जोरदार घोषणाबाजीपेडणेकर सभागृहातून गेल्यावर महायुतीच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. त्यास उद्धवसेनेच्या नगरसेवकांनीही पेडणेकर यांनी चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे गदारोळ सुरूच राहिला.
Web Summary : Controversy erupted after remarks about Balasaheb Thackeray. Opposition leader Kishori Pednekar faced calls for apology, which she refused. The house was adjourned amid protests. BJP demanded her suspension, while Pednekar denied making the statement.
Web Summary : बालासाहेब ठाकरे पर टिप्पणी के बाद विवाद। विपक्षी नेता किशोरी पेडनेकर से माफी की मांग की गई, जिसे उन्होंने अस्वीकार कर दिया। विरोध के बीच सदन स्थगित। बीजेपी ने उनके निलंबन की मांग की, जबकि पेडनेकर ने बयान देने से इनकार किया।