तारपा नृत्याच्या शिल्पाचे अनावरण

By Admin | Updated: June 23, 2015 23:36 IST2015-06-23T23:36:43+5:302015-06-23T23:36:43+5:30

या नगरपरिषदेतर्फे डहाणू - जव्हार या सिंहस्थ कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील सागरनाका या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरात आदिवासी समाजाच्या अस्मितेचे दर्शन

The unveiling of the Shilpa of Tarpa dance | तारपा नृत्याच्या शिल्पाचे अनावरण

तारपा नृत्याच्या शिल्पाचे अनावरण

डहाणू : या नगरपरिषदेतर्फे डहाणू - जव्हार या सिंहस्थ कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील सागरनाका या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरात आदिवासी समाजाच्या अस्मितेचे दर्शन घडवणाऱ्या तारपा नृत्याच्या शिल्पाचे मंगळवारी डहाणू शहरात मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. या सागरनाक्याचे लोकमान्य टिळक चौक असे नामकरणही या वेळी करण्यात आले.
गेल्या अडीच वर्षात डहाणू नगरपरिषदेतर्फे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली. सागरनाका येथे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मनमोहक अशा तारपा नृत्याचे शिल्प उभे करण्यात आले असून आज या शिल्पाचे आ. आनंद ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी विद्यमान नगरसेवक राजेश पारेख, मावळते नगराध्यक्ष मिहिर शाह, नवनिर्वाचित नगराध्यक्षा रमिला पाटील, माजी आ. राजाराम ओझरे, उपनगराध्यक्ष प्रदिप चाफेकर, मुकुंदराव चव्हाण, शमी पीरा, रविंद्र फाटक, मुख्याधिकारी अतुल पिंपळे इ. मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The unveiling of the Shilpa of Tarpa dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.