नागोठणेत खारभूमी खात्याचा अंदाजपत्रकांचा अजब कारभार
By Admin | Updated: March 29, 2015 22:27 IST2015-03-29T22:27:27+5:302015-03-29T22:27:27+5:30
खारबंदिस्तीमधील तुटल्या गेलेल्या खांडी ठेकेदाराने बांधल्याबाबतचे पत्र संबंधित ग्रामपंचायतीकडून मिळाल्यानंतर खारभूमी विभागाकडून खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले जात आहे

नागोठणेत खारभूमी खात्याचा अंदाजपत्रकांचा अजब कारभार
नागोठणे : खारबंदिस्तीमधील तुटल्या गेलेल्या खांडी ठेकेदाराने बांधल्याबाबतचे पत्र संबंधित ग्रामपंचायतीकडून मिळाल्यानंतर खारभूमी विभागाकडून खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले जात आहे. असा प्रकार शासनाच्या इतर कोणत्याही खात्यांमध्ये होत नसल्याने याच खात्यात हा प्रकार का, असा सवाल उपस्थित करीत आहेत.
मोठ्या उधाणामुळे किंवा अजस्त्र बोट वाहतुकीमुळे धरमतर ते गणेशपट्टी व पेणकडे उर्णोलीपर्यंतच्या परिसरातील खारबंदिस्तीला खांडी जावून शेती नापीक होण्याचे प्रमाण अधिक आहे. उधाणाच्या तडाख्यामुळे गेलेल्या खांडी स्थानिक ठेकेदार त्वरित बांधतात. स्थानिक शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान होवू नये म्हणून ठेकेदार या खांडीची तातडीने दुरु स्ती करीत असतात. खांडी गेल्यानंतर त्याची त्वरित पाहणी करून येणाया खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणेहे खारभूमी विभागाचे काम असूनही त्यात वेळकाढू धोरणच अवलंबिले जात आहे.
होळीच्या उधाणात गेलेल्या खांडीचे अंदाजपत्रक तयार करण्यास खारभूमी विभागाला कोजागिरी पौर्णिमा उजाडत असते, त्यामुळे मधल्या काळात गेलेल्या खांडी ठेकेदार पुन्हा बांधतच असल्याने या प्रलंबित अंदाजपत्रकांच्या संख्येत वाढच होते. खारभूमी विभागाला मिळणाऱ्या अपुऱ्या अनुदानामुळे पूर्ण झालेल्या योजनेची देयके पूर्ण स्वरु पात देण्याऐवजी प्राप्त अनुदानाची वाटणी केली जात असते, असे त्यांचे म्हणणे आहे. माहिती घेतली असता बापळे (दहा लाख ), सुडकोली, शहाबाज (प्रत्येकी पंधरा लाख ), ताजपूर ( दहा लाख ), शहापूर-धेरंड ( नऊ लाख), बेलखार (दहा लाख), वावे- वडखळ (सात लाख त्र्याहत्तर हजार), वढाव - बोर्झे ( सात लाख पंचेचाळीस हजार ) अशा भागातील खांडींच्या मंजूर झालेल्या अंदाजपत्रकांच्या रकमा अपुऱ्या अनुदानाअभावी ठेकेदारांना मिळणे बाकी असल्याचे समजले. (वार्ताहर)