जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

By Admin | Updated: March 30, 2015 00:14 IST2015-03-30T00:14:00+5:302015-03-30T00:14:00+5:30

दिवसा कडक ऊन तर रात्रीच्या जीवघेण्या उकाड्याने नागरिक हैराण आहेत. त्यात सायंकाळी किंवा सकाळी जिल्ह्यात अवकाळी पाऊस तीन

Unseasonal rains in the district | जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

ठाणे: दिवसा कडक ऊन तर रात्रीच्या जीवघेण्या उकाड्याने नागरिक हैराण आहेत. त्यात सायंकाळी किंवा सकाळी जिल्ह्यात अवकाळी पाऊस तीन दिवसांपासून कमीअधिक पडत आहेत. रविवारीदेखील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरी भागांसह काही गावपाड्यांमध्ये अवकाळी पावसाचा शिडकावा झाला.
दिवसभरातील दमट हवामानामुळे घामाच्या धारा, त्यात तीव्र उष्माघाताने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात अधूनमधून पडलेला पाऊस निघून गेल्यानंतर पुन्हा कडाक्याचे ऊन नकोनकोसे झाले आहे. वादळवाऱ्यासह विजेचा कडकडाट व पाऊस पडत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम रब्बी पिकांसह फळबागांवर होत आहे. वाडा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यांतील आंब्याच्या बागांमध्ये कवळ्या कैऱ्या गळून पडल्या आहेत. काजू, चिकूच्या बागांमध्ये हीच स्थिती पाहायला मिळत आहे. टोमॅटो, पालक, मेथी, माठ, कोथिंबीर, काकडी या पालेभाज्यांसह वाल, हरभरा आदी कडधान्याचेदेखील जिल्ह्यात नुकसान झाले आहे.

Web Title: Unseasonal rains in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.