Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे निकाल २१ दिवसांत जाहीर, ६९.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 06:49 IST

विद्यापीठाने घेतलेल्या बी. एस्सी. सत्र ५ या परीक्षेसाठी एकूण ६,८७९ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी ६,७०४ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून जलदगतीने २१ दिवसांत निकाल लावून हिवाळी सत्राच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. द्वितीय हिवाळी सत्र २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बीएससी आणि बीएससी आयटी तृतीय वर्ष सत्र ५ चा निकाल विद्यापीठाने जाहीर केला असून, त्यामध्ये ६९.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

विद्यापीठाने घेतलेल्या बी. एस्सी. सत्र ५ या परीक्षेसाठी एकूण ६,८७९ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी ६,७०४ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत ४२४५ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ६३.३५ एवढी आहे, अशी माहिती विद्यापीठाने दिली. बी.एस्.सी. आयटी सत्र ५ या परीक्षेसाठी १०,६८३ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी १०,५८४ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

या परीक्षेत ७३७७ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ६९.८२ एवढी आहे, असेही विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. दरम्यान या दोन्ही परीक्षांचे निकाल मुंबई विद्यापीठाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ