The University has no record of results ..! | विद्यापीठाकडे निकालाची नोंदच नाही..!

विद्यापीठाकडे निकालाची नोंदच नाही..!

मुंबई : विद्यापीठाच्या सर्व परीक्षांत पास असतानाही गुणपत्रिकेसाठी वारंवार विद्यापीठाचे खेटे मारणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच डोक्यावर विद्यापीठ अधिकाऱ्यांनी अखेर आपली चूक लपविण्यासाठी खापर फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात या विद्यार्थ्याने कुलगुरूंना पत्र लिहून तक्रार केली आहे. सोबतच जर विद्यापीठ अधिकाºयाच्या माहितीनुसार त्यांच्याजवळ मागील ५ वर्षांतील माहिती उपलब्ध नसेल तर हे विद्यापीठ अधिनियमनाच्या विरुद्ध असून यासंबंधी तक्रार दाखल का करण्यात येऊ नये, असा सवाल उपस्थित केला आहे.
विनोद सांगवीकर या विद्यार्थ्याने २०१४ साली एलएलएम सत्र २ ची दिली होती. या परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल लागून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून त्यावेळी तो संकेतस्थळावर जाहीर ही करण्यात आल्याची माहिती या विद्यार्थ्याने दिली. दरम्यान निकाल लागला तरी या परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाही गुणपत्रिका मात्र या विद्यार्थ्याला विद्यापीठाकडून प्राप्त न झाल्याने विद्यार्थ्याने वारंवार याचा पाठपुरावा केला. परंतु जेव्हा गुणपत्रिका येईल तेव्हा कळवले जाईल, असे उत्तर विद्यार्थ्याला मिळाले. २२ आॅगस्ट रोजी गुणपत्रिकेसाठी पुन्हा या विद्यार्थ्याने चिौकशी केली असता नोंदवहीत आधीच उत्तीर्ण असलेल्या विषयाची नोंद त्याला आढळली. अधिकाºयाला विद्यार्थ्याने चूक निदर्शनास आणून दिल्यावर अधिकाºयांनी २०१४ चे तपशील आम्ही ठेवले नसल्याचे उत्तर विद्यार्थ्याला दिले. अधिकाºयांनी कागदपत्रे, निकालच बोगस असल्याचा दावा केला आणि या चुकीचे खापर त्याच्यावरच फोडले असल्याची माहिती त्याने दिली. या संबंधित आता या विद्यार्थ्याने विद्यार्थी संघटनेकडे धाव घेतली असून कुलगुरू सुहास पेडणेकर यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी विद्यापीठ अशाप्रकारे खेळत असेल तर ही गंभीर बाब असून विद्यापीठ कायद्यानुसार मागील ५ वर्षांची नोंद विद्यापीठाने ठेवणे बंधनकारक असल्याची प्रतिक्रिया स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The University has no record of results ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.