विद्यापीठाकडून सागरी अभ्यास केंद्र स्थापन
By Admin | Updated: September 7, 2014 01:55 IST2014-09-07T01:55:31+5:302014-09-07T01:55:31+5:30
सागरी विज्ञान क्षेत्रत दिवसेंदिवस होत असलेले बदल तसेच या क्षेत्रत निर्माण होऊ पाहणा:या रोजगाराच्या संधी विचारात घेऊन मुंबई विद्यापीठाने सागरी अभ्यास केंद्र स्थापन केले आहे.

विद्यापीठाकडून सागरी अभ्यास केंद्र स्थापन
मुंबई : सागरी विज्ञान क्षेत्रत दिवसेंदिवस होत असलेले बदल तसेच या क्षेत्रत निर्माण होऊ पाहणा:या रोजगाराच्या संधी विचारात घेऊन मुंबई विद्यापीठाने सागरी अभ्यास केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रात विद्याथ्र्याना आठ विषयांचा अभ्यास करता येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील व्हच्र्युअल क्लासरूममध्ये शुक्रवारी या केंद्राचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणो यांच्या हस्ते झाले. या वेळी राणो म्हणाले की, शिक्षक दिनी मुंबई विद्यापीठाने सुरू केलेली सिंधू स्वाध्याय संस्था (सागरी अभ्यास केंद्र) ही अनेक तरुणांच्या हाताला काम देणारी संस्था म्हणून उदयास येणार असून, रोजगार निर्मितीच्या क्षेत्रत क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे.
72क् किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेल्या या भू-भागात रोजगाराच्या अनेक संधी असून, त्या तरुणांर्पयत पोहोचविण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये ही संस्था उदयास येणार आहे.
या केंद्रामध्ये सहा वर्षामध्ये 8 ज्ञानशाखा सुरू होणार असून, यामध्ये तंत्र व विज्ञान क्षेत्रतील 16क् तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी पदव्युत्तर वर्ग, प्रमाणपत्र-पदविका वर्ग राबविले जातील. तसेच विद्याथ्र्याना पीएच.डी.चे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. (प्रतिनिधी)
सिंधू स्वाध्याय संस्थेमार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम : सागरी जीवशास्त्न व मत्सोद्योग, सागरीशास्त्र, सामाजिक व आर्थिक अभ्यास केंद्र, नौकानयन व मासेमारी, किनारपट्टी तसेच जीवशास्त्नीय भूशास्त्न, खनिज, तेल, वायू, सागरी तंत्रज्ञान, सागरी कायदा व सुव्यवस्था, किनारपट्टी विभाग व्यवस्थापन