विद्यापीठात व्यवस्थापन शिक्षण संकुल!

By Admin | Updated: October 4, 2014 01:23 IST2014-10-04T01:23:13+5:302014-10-04T01:23:13+5:30

मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे माजी विद्यार्थी संस्थेच्या आमुलाग्र कायापालटासाठी सरसावले आहेत.

University Education Management Package! | विद्यापीठात व्यवस्थापन शिक्षण संकुल!

विद्यापीठात व्यवस्थापन शिक्षण संकुल!

>आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा : माजी विद्याथ्र्यानी दिले 85 कोटी रुपये
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे माजी विद्यार्थी संस्थेच्या आमुलाग्र कायापालटासाठी सरसावले आहेत. या विद्याथ्र्यानी संस्थेला 85 कोटींची भरघोस मदत केली असून या निधीतून विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅम्पस उभारण्यात येणार आहे.
विद्यानगरी परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॅम्पसच्या स्थाननिश्चितीचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इन्स्टिटय़ूटच्या माजी विद्याथ्र्यानी संस्थेला 85 कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. संस्थेतील माजी विद्यार्थी आणि नामांकित उद्योगाचे प्रमुख चंदा कोचर,अजय पिरामल, उदय कोटक, सॅम बलसारा, नोशिर काका आणि हरिश मनवानी यांच्या पुढाकाराने 85 कोटी रुपये संस्थेला दिले आहेत. यामधून विद्यानगरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे शैक्षणिक कॅम्पस उभे राहणार आहे. या नव्या शैक्षणिक संकूलात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यवस्थापनाचे शिक्षण देणा:या संस्थांच्या तुलनेत परवडणा:या दरामध्ये शिक्षण उपलब्ध करुन दिले जाणार असून या विद्याथ्र्याना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. 
जमनालाल बजाज संस्थेतून व्यवस्थापन शिक्षणक्रमांची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्याथ्र्यांची संख्या 15 हजाराच्या वर आहे. यातील हजारो विद्याथ्र्यानी आज जगाच्या पाठीवर आपला ठसा उमटवला आहे.  
या सोहळ्य़ाला विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.राजन वेळूकर, प्र-कुलगुरु डॉ.नरेश चंद्र,बीसीयुडी संचालक डॉ.राजपाल हांडे, कुलसचिव, डॉ.एम.ए.खान, संस्थेच्या संचालिका डॉ.कविता लघाटे आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: University Education Management Package!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.