Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे बजेट १०५४ कोटींवर, संशोधन व नवोपक्रमासाठी १५ कोटींची तरतूद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:57 IST

अर्थसंकल्प विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी हर्षल वाघ यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या उपस्थितीत अधिसभेत सादर केला.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा १०५४.१२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. गेल्यावर्षी ९६८ कोटींच्या तुलनेत यंदा ८६ कोटींची वाढ झाली, तर यंदा १७२ कोटी ६३ लाखांची तूट दाखविण्यात आली आहे. 

अर्थसंकल्प विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी हर्षल वाघ यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या उपस्थितीत अधिसभेत सादर केला.  वित्तीय वर्ष २०२६-२७ मध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि सीएसआर अंतर्गत १८७ कोटी रुपयाचा निधी प्राप्त होणार असून, यामध्ये केंद्र शासनाकडून १२९.५६ कोटी, राज्य शासनाकडून ३३ कोटी, सीएसआर अंतर्गत १३.९१ कोटी आणि मुंबई विद्यापीठाकडून १० कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतुदीचा समावेश आहे. दरम्यान, आगामी वर्षात विद्यार्थी वसतिगृह, १०० केडब्ल्यूपी सौर उर्जा प्रकल्प, क्रीडा सुविधांच्या बांधकामांचा प्रस्ताव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे २० केडब्ल्यू सौर उर्जा प्रकल्प असे अशी अनेक पायाभूत कामे पार पाडली जाणार आहे. 

संशोधन व नवोपक्रमासाठी १५ कोटींची तरतूद केंद्रीय संशोधन, उत्कृष्ट संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट संशोधन निधी व नवोपक्रम पुरस्कार दिले जातील. नोबेल पारितोषिक विजेत्यांची विशेष व्याख्यानमाला,  सखोल समुद्र संशोधन अशा महत्त्वपूर्ण  संशोधनाला विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे.

आगामी वर्षात होणारी काही महत्त्वाची पायाभूत कामेमुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (२ रा टप्पा)पीएम-उषा अंतर्गत ५० क्षमतेचे मुलींचे वसतिगृहअल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राची इमारत, महात्मा ज्योतिबा फुले परीक्षा केंद्र या इमारतीचे नूतनीकरणजगन्नाथ शंकरशेठ हॉल, फोर्ट परिसर इमारतीचे दुरुस्ती आणि नूतनीकरणठाणे उपकॅम्पसमध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), विद्यानगरी कॅम्पसमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प 

शैक्षणिक उत्कृष्टता वृद्धिंगत करण्यासाठी १० कोटी विद्यापीठाने विविध पुरस्कार, विद्यापीठ विभागांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, विविध क्षेत्रातील नामांकित प्राध्यापकांची नियुक्ती, प्रख्यात प्राध्यापक नियुक्ती, विविध प्रशिक्षणे, शिक्षकांसाठी ई-कंटेंट विकास प्रशिक्षण, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठे व संस्थांशी सहकार्य आणि संयुक्त संशोधन यासह एआयचा वापर केला जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai University's Budget Surpasses ₹1054 Crore, Focus on Research.

Web Summary : Mumbai University's budget reached ₹1054.12 crore, prioritizing research and innovation with ₹15 crore allocated. Key projects include hostel construction, solar power initiatives, and infrastructure upgrades, alongside academic excellence programs.
टॅग्स :मुंबई विद्यापीठअर्थसंकल्प २०२६