बीएच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल विद्यापीठाकडून जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:10+5:302021-07-28T04:07:10+5:30

मुंबई : यावर्षी मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पारंपरिक मानव्य विद्याशाखेच्या बीए सत्र ६, तिसऱ्या ...

University announces third year BA results | बीएच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल विद्यापीठाकडून जाहीर

बीएच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल विद्यापीठाकडून जाहीर

मुंबई : यावर्षी मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पारंपरिक मानव्य विद्याशाखेच्या बीए सत्र ६, तिसऱ्या वर्षाच्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेचा निकाल ९३.२१ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एकूण ९ हजार ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १४ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार २२४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते, तर ९७ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. परीक्षेत ६७८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ९२ निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने तृतीय वर्ष बीएसमवेत बीई (केमिकल इंजिनिअरिंग ) सत्र ८, बीई (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग) सत्र ८ असे एकूण तीन निकाल जाहीर केले आहेत.

Web Title: University announces third year BA results