मुरुडमध्ये संयुक्त आघाडी
By Admin | Updated: September 26, 2014 23:46 IST2014-09-26T23:46:24+5:302014-09-26T23:46:24+5:30
पुरोगामित्वाचा पोकळ दावा करणाऱ्या आणि प्रत्यक्षात प्रतिगामी असलेल्या भाजपा-शिवसेना युतीने महाराष्ट्रास सत्तेसाठी ओरबाडले, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महाराष्ट्रास चक्क धुवून काढले

मुरुडमध्ये संयुक्त आघाडी
अलिबाग : पुरोगामित्वाचा पोकळ दावा करणाऱ्या आणि प्रत्यक्षात प्रतिगामी असलेल्या भाजपा-शिवसेना युतीने महाराष्ट्रास सत्तेसाठी ओरबाडले, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महाराष्ट्रास चक्क धुवून काढले. अशा या युत्या आणि आघाड्या आता मोडीत निघाल्या असून, ख-या अर्थाने पुरोगामी विचारांच्या जनता दल युनायटेड, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पार्टी, रिपब्लिकन सेना आणि शिवराज्य पार्टी या राजकीय पक्षांची संयुक्त पुरोगामी आघाडी महाराष्ट्रास पुढे नेईल, असा निर्धार जनता दल युनायटेडचे अध्यक्ष माजीखासदार शरद यादव, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पार्टीचे प्रमुख कॉ.प्रा.अशोक ढवळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर आणि शिवराज्य पार्टीचे अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडीयर सुधीर सांवंत यांनी सभेत केला.