दिग्गज कलावंतांनी सादर केले अनोखे राष्ट्रगीत
By Admin | Updated: January 26, 2015 00:38 IST2015-01-26T00:38:25+5:302015-01-26T00:38:25+5:30
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने दिग्गज कलाकारांच्या साथीने राष्ट्रगीताची रचना केली आहे

दिग्गज कलावंतांनी सादर केले अनोखे राष्ट्रगीत
मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने दिग्गज कलाकारांच्या साथीने राष्ट्रगीताची रचना केली आहे. देशातील १२ वाद्यरत्नांनी या राष्ट्रगीतामध्ये सूर-तालाचे रंग भरले असून, सर्व चित्रपटगृहांमध्ये हे राष्ट्रगीत वाजविले जाणार आहे.
अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्या संकल्पनेतील या राष्ट्रगीताचे सादरीकरण भव्यदिव्य पद्धतीने करण्यात आले आहे. राष्ट्रगीताचे संगीत संयोजन करताना त्याचे मांगल्य आणि पावित्र्यही जपणे आवश्यक होते. कमलेश भडकमकर, आदित्य ओक, विनायक नेटके आणि श्रीधर पार्थसारथी यांनी ते अप्रतिमरीत्या सांभाळल्याचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले. पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खान, उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासह अनेक कलाकारांनी या राष्ट्रगीताला सूर-तालाचा साज चढवला आहे.