युनियन करणार स्वतंत्र सव्र्हे
By Admin | Updated: August 9, 2014 00:48 IST2014-08-09T00:48:43+5:302014-08-09T00:48:43+5:30
मुंबई महानगरपालिकेने केलेल्या फेरीवाला सव्रेक्षणाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगत मुंबई हॉकर्स युनियनने फेरीवाल्यांचा स्वतंत्र सव्र्हे करण्याचा निर्णय घेतला आहे.

युनियन करणार स्वतंत्र सव्र्हे
>चेतन ननावरे ल्ल मुंबई
केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणांतर्गत मुंबई महानगरपालिकेने केलेल्या फेरीवाला सव्रेक्षणाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगत मुंबई हॉकर्स युनियनने फेरीवाल्यांचा स्वतंत्र सव्र्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरातील सुमारे 3 लाख फेरीवाल्यांचा सव्र्हे करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून युनियनने वॉर्डनिहाय स्वतंत्र पथक नेमल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे.
सध्या तरी युनियनमार्फत फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींच्या गुप्त बैठका सुरू आहेत. संघटनेमार्फत फेरीवाल्यांचे सव्रेक्षण करून ते लवकरच न्यायालयात सादर करण्याची युनियनची योजना आहे. पालिकेने 28 जुलैर्पयत केलेल्या सव्रेक्षणात सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र शासनाच्या अटींची पूर्तता केली नसल्याचा युनियनचा आरोप आहे. तरी नियमांचे पालन, कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन लढा लढून फेरीवाल्यांना प्रत्यक्ष परवाना मिळण्यासाठी फेरीवाल्यांना आणखी पाच वर्षे लागतील, असा अंदाज आहे.
याआधी केंद्र शासनाने फेरीवाला धोरणाची आखणी करत फेरीवाल्यांचा सव्र्हे करून त्यांना परवाने देण्याचे परिपत्रक काढले. परवाने दिल्याने शहराचे योग्य नियोजन होईल, अशी केंद्राची भूमिका होती. मात्र पालिकेचे ढिसाळ नियोजन, राजकीय पक्षांची लुडबूड आणि भ्रष्ट अधिका:यांमुळे फेरीवाला सव्रेक्षणाचाच बोजवारा उडाला आहे.
च्युनियनतर्फे प्रत्येक वॉर्डमध्ये युनियनचे वॉर्ड अध्यक्ष काही फेरीवाला प्रतिनिधींना हाताशी घेऊन नोंदणी करण्यात पुढाकार घेतील. दरम्यान, स्थानिक राजकीय प्रतिनिधी किंवा गुंडांनी अडथळा निर्माण केल्यास स्थानिक फेरीवाले आणि युनियनचे एक विशेष पथक एकत्र येऊन त्यांना चोख उत्तर देतील.
च्तीन महिन्यांत युनियन शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांतील फेरीवाल्यांचे सव्रेक्षण पूर्ण करेल. दरम्यान, सव्रेक्षणात फेरीवाल्यांचे फोटो काढण्यासाठी युनियनने 12 छायाचित्रकारांची नेमणूक केल्याचे सूत्रंनी सांगितले.
च्आतार्पयत परवाना नसताना पदपथापासून सार्वजनिक ठिकाणी फेरी लावल्याबद्दल फेरीवाल्यांवर पोलीस, पालिका आणि अन्य प्रशासकांकडून कारवाई होत होती.
च्त्याबदल्यात फेरीवाल्यांना पावती मिळायची. मात्र हीच पावती युनियन सव्रेक्षण करताना पुरावा म्हणून वापरणार असल्याचे समजते. पालिका अधिका:यांनी सव्रेक्षणात या पुराव्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
पालिकेने 28 जुलैर्पयत केलेल्या सव्रेक्षणात 1 लाख 28 हजार 443 अर्जाची विक्री
केली.
सन 2क्क्5 र्पयत मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या ही 15 हजार 159 इतकी होती.
युनियनच्या म्हणण्यानुसार, शहर, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरांत 3 लाख फेरीवाले आहेत.
च्युनियनमार्फत होणारे सव्रेक्षण सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याच्या वृत्तावर युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी शिक्कामोर्तब केले. मात्र फेरीवाला सव्रेक्षण करण्याची पद्धत गुप्त आहे.