सीवूड येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: July 13, 2015 23:28 IST2015-07-13T23:28:32+5:302015-07-13T23:28:32+5:30
सीवूड येथील नाल्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी घडली. या व्यक्तीची ओळख पटली नसून खाडीच्या पाण्यात मृतदेह

सीवूड येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
नवी मुंबई : सीवूड येथील नाल्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी घडली. या व्यक्तीची ओळख पटली नसून खाडीच्या पाण्यात मृतदेह वाहत आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत.
सीवूड रेल्वेस्थानकापासून काही अंतरावरील नाल्यामध्ये रेल्वे पुलाखाली हा मृतदेह पडला होता. काही व्यक्तींना पाण्यावर तरंगत असलेला हा मृतदेह दिसला. नाल्यातील पाण्यामध्ये वाढलेल्या खारफुटीमध्ये तो अडकून पडला होता. याची माहिती एनआरआय पोलिसांना मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
सुमारे ३० ते ३५ वर्षांच्या व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याची ओळख पटलेली नाही, असे वरिष्ठ निरीक्षक विष्णू रेडकर यांनी सांगितले. खाडीच्या पाण्यासोबत भरतीच्यावेळी हा मृतदेह नाल्यामध्ये आल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मृतदेह सुमारे चार दिवसांपूर्वीचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहे. या व्यक्तीने आत्महत्या केली असावी, किंवा तो रेल्वेतून पडला असावा असाही प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. मागील आठवड्यातच सीबीडी स्थानकालगत बेवारस मृतदेह सापडला होता. (प्रतिनिधी)