फलकावरील ‘न पुसता आलेली आठवण..!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:06 IST2021-03-21T04:06:42+5:302021-03-21T04:06:42+5:30
राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले संपूर्ण वर्ष सांस्कृतिक मंडळांसाठी कोरडे गेले. नवीन वर्षात तरी सांस्कृतिक आणि ...

फलकावरील ‘न पुसता आलेली आठवण..!’
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले संपूर्ण वर्ष सांस्कृतिक मंडळांसाठी कोरडे गेले. नवीन वर्षात तरी सांस्कृतिक आणि इतर तत्सम उपक्रमांना उत्साहात प्रारंभ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आशेचा किरण दिसत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढू लागला आहे. त्यामुळे गेले वर्षभर बंद असलेल्या सांस्कृतिक मंडळांच्या उपक्रमांवर अजूनही बऱ्यापैकी पडदा पडलेला आहे. माहीम येथील अशाच एका मंडळाचा फलक याबाबतीत फारच बोलका ठरला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील मंडळाच्या नियोजित कार्यक्रमांची सूचना या फलकाद्वारे त्या वेळी देण्यात आली होती. मात्र एक वर्ष लोटले, तरी अद्याप या फलकाच्या नशिबी ‘जैसे थे’ची वेळ येऊन ठेपली आहे. वर्षभर या मंडळात कुणी फिरकले नसल्याने, या फलकावरील ‘न पुसता आलेली आठवण’ वर्तमानातही तशीच कायम राहिली आहे.
...........................