अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला ९ मार्चपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:06 IST2021-02-24T04:06:39+5:302021-02-24T04:06:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला मंगळवारी मुंबईत आणण्यात आले. विलेपार्ले येथील गझाली हॉटेलमध्ये २०१६ साली ...

Underworld gangster Ravi Pujari remanded till March 9 | अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला ९ मार्चपर्यंत कोठडी

अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला ९ मार्चपर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला मंगळवारी मुंबईत आणण्यात आले. विलेपार्ले येथील गझाली हॉटेलमध्ये २०१६ साली झालेल्या गोळीबारप्रकरणी त्याला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुजारीविरुद्ध मुंबईसह कर्नाटक, बंगळुरू, मंगळुरू आणि गुजरात अशा विविध ठिकाणी दीडशेहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने स्वतंत्र टोळी तयार करून व्यावसायिक, चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्तींना खंडणीसाठी धमकावले आहे. गोळीबार, खंडणीसारखे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुजारीविरोधात मुंबईत ४९ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १० गुन्ह्यांत भक्कम पुरावे पाेलिसांच्या हाती आले असून, याच पुराव्यांच्या आधारे पुजारीचा ताबा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी पुजारीविरुद्ध मुंबईत दाखल उर्वरित गुन्ह्यांची कुंडली काढली असून त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.

...........................

Web Title: Underworld gangster Ravi Pujari remanded till March 9