Join us
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मेट्रो ३ चे चर्चगेट ते हुतात्मा चौक ६४८ मीटर लांब भुयारीकरण झाले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 06:07 IST

Metro : ५०६ रिंग्जच्या साहाय्याने २९२ दिवसांत हे अप लाइन मार्गाचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. सूर्या-१ या टनेल बोअरिंग मशीनद्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम वेगाने सुरू असून, लॉकडाऊन शिथिल होत असतानाच या कामाने आणखी वेग पकडला आहे. शुक्रवारी चर्चगेट ते हुतात्मा चौक हा ६४८ मीटर लांब ३४ वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला.५०६ रिंग्जच्या साहाय्याने २९२ दिवसांत हे अप लाइन मार्गाचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. सूर्या-१ या टनेल बोअरिंग मशीनद्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.हुतात्मा चौक या मेट्रो-३ मार्गावरील स्थानकामुळे चर्चगेट रेल्वे स्थानक, काही देशांचे दूतावास, उच्च न्यायालय, बँकांचे व वित्तीय संस्थांची मुख्यालये, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बलार्ड इस्टेट, इस्पितळे, महाविद्यालये, वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियम, जहांगीर आर्ट गॅलरी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एशियाटिक लायब्ररी, गेट वे ऑफ इंडिया व विविध उपाहारगृहे इत्यादी स्थळांना पोहोचणे अधिक सुलभ होईल.

हुतात्मा चौक स्थानकाचे एकूण ५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पॅकेज-१मध्ये ८१ टक्के भुयारीकरण आणि ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ८९ टक्के भुयारीकरण व ६१ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.- रणजित सिंह, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

टॅग्स :मेट्रो