Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशात अघोषित आणीबाणी - शरद यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 04:35 IST

देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे, लोकशाही संकटात आहे, अशा परिस्थितीत जागरूक मतदाराचे इमानच या मनुवादी प्रवृत्तीला पराभूत करू शकेल.

मुंबई  - देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे, लोकशाही संकटात आहे, अशा परिस्थितीत जागरूक मतदाराचे इमानच या मनुवादी प्रवृत्तीला पराभूत करू शकेल. मुंबईच्या शिक्षकांनी ते इमान दाखवून लोकशाहीच्या लढ्याला नवे बळ दिले आहे, असे प्रतिपादन लोकतांत्रिक जनता दलाचे खासदार शरद यादव यांनी शनिवारी येथे केले.मुंबई शिक्षक मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळविणाºया आमदार कपिल पाटील यांच्या विजयाची हॅट्ट्रिक झाल्याच्या निमित्ताने शिक्षक भारतीच्या वतीने आयोजित दादरच्या शिवाजी मंदिरात संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, आमदार हितेंद्र ठाकूर, अशोक बेलसरे, रविकांत तूपकर, संभाजी भगत आदी उपस्थित होते.खा. यादव म्हणाले, मुंबईच्याशिक्षकांनी इमानदारी दाखवत कपिलपाटील यांना आमदार करून चांगला संदेश दिला, देशातील सर्व मतदारांनी चांगल्या माणसांना मते देण्याचा धडा यातून घेतला पाहिजे, तरच आपण सध्याच्या अघोषित आणीबाणीचा सामना करू शकू, मनुवादी शक्तींचा पराभव करू, असे त्यांनी स्पष्टकेले.खा. राजू शेट्टी यांनी मुंबईच्या शिक्षकांचे आभार मानत शेतकºयांच्या आंदोलनाला साथ देण्याचे आवाहन केले. मुंबईच्या शिक्षकांनी दिलेला निर्णय ऐतिहासिक आणि दिशादर्शक आहे. चांगुलपणावरचा माझा विश्वास तुम्ही वाढवला, चळवळी करणाºयांना बळ दिले, असे ते म्हणाले.तर, कपिल पाटील यांनीही सत्ता, पैसा आणि दादागिरीला ठोकरून मुंबईच्या शिक्षकांनी शिक्षणाच्या हक्कांसाठीच्या चळवळीची साथ दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले. या वेळी हितेंद्र ठाकूर यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन सुभाष मोरे यांनी केले.

टॅग्स :राजकारणमुंबई