घर नावावर करण्यास नकार दिल्याने काकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:06 IST2021-03-19T04:06:13+5:302021-03-19T04:06:13+5:30
मारेकऱ्याला जन्मठेप लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आईवडिलांच्या पश्चात सांभाळ करणाऱ्या काकाने घर नावावर करून न दिल्याने त्यांची हत्या ...

घर नावावर करण्यास नकार दिल्याने काकाची हत्या
मारेकऱ्याला जन्मठेप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आईवडिलांच्या पश्चात सांभाळ करणाऱ्या काकाने घर नावावर करून न दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी २९ वर्षांच्या तरुणाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आतिष पटेल असे आराेपीचे नाव आहे. आशिष १० ऑक्टोबर, २०१४ साली त्याचे काका किसन खारवी यांना बोरीवलीत त्यांच्या घरी भेटायला गेला होता. त्यांच्या ताब्यात असलेले पटेलचे घर त्याच्या नावावर करण्यासाठी त्याने तगादा लावला. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्याने काका खारवी यांची हत्या केली. खारवींचा मुलगा विनोदने याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो घरी पोहोचला तेव्हा पटेल एका बाजूला बसला होता तर त्याचे वडील खारवी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. पटेलने खारवींचे डोके तीन वेळा भिंतीला आपटून नंतर त्यांचा गळा दाबून त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.