बेवारस ट्रक आढळला

By Admin | Updated: March 7, 2016 02:28 IST2016-03-07T02:28:51+5:302016-03-07T02:28:51+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील सागर हॉटेलजवळ मालाने भरलेला ट्रक बेवारस अवस्थेत आढळून आला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील

Unavoidable truck found | बेवारस ट्रक आढळला

बेवारस ट्रक आढळला

बिरवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील सागर हॉटेलजवळ मालाने भरलेला ट्रक बेवारस अवस्थेत आढळून आला आहे.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सागरजवळ ट्रक क्र मांक एमएच ०४ डीडी ७०१२ हा माल भरलेला ट्रक बेवारस अवस्थेत बीट मार्शल पथकाचे कर्मचारी पोलीस नाईक मंदार लहाने यांना आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती प्रभारी अधिकारी सस्ते यांना दिली. पोलिसांनी तपास केला असता वरील क्र मांकाचा ट्रक घेऊन चालक सचिन खुलते हा गोवा येथून भिवंडी येथील कंपनीचा कांजी पावडर माल घेऊन निघाला होता. मात्र तो ट्रक सोडून बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याचा मोबाइल बंद असल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे. (वार्ताहर)

Web Title: Unavoidable truck found