अनधिकृत आठवडा बाजाराची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
By Admin | Updated: March 16, 2015 01:47 IST2015-03-16T01:47:05+5:302015-03-16T01:47:05+5:30
खारघर नव्याने विकसित होणारे शहर असून, सिडकोने नियोजनबध्द पद्धतीने या शहराचा विकास केला आहे, मात्र याठिकाणच्या अनधिकृत बाजारपेठा या

अनधिकृत आठवडा बाजाराची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
पनवेल : खारघर नव्याने विकसित होणारे शहर असून, सिडकोने नियोजनबध्द पद्धतीने या शहराचा विकास केला आहे, मात्र याठिकाणच्या अनधिकृत बाजारपेठा या शहरातील मुख्य समस्या बनल्या आहेत. सिटीझन फोरमने यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र लिहून अशाप्रकारच्या आठवडा बाजारपेठ भरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सेक्टर - १० हा खारघरमधील टोलेजंग इमारती असलेला मोठा परिसर आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच काही व्यक्तींनी शनिवारी आठवडा बाजार भरविण्यास सुरु वात केली. हा बाजार संपूर्ण अनधिकृत असून, यामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तसेच येथे व्यवसाय करणारे फेरीवाले तो कचरा याच ठिकाणी टाकून दुर्गंधी पसरवितात. त्यामुळे येथील ५९ रहिवासी संकुलातील नागरिकांनी ‘सेक्टर १०’ सिटीझन फोरमच्या नावाने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून अशाप्रकारचे आठवडा बाजार थांबविण्यात यावेत, अशी विनंती केली आहे .
सेक्टर - १० सिटीजन फोरम हा खारघर कॉलनी फोरमच्या अंतर्गत येतो. यासंदर्भात खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांंनी सांगितले की, अशाप्रकारच्या आठवडा बाजारामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना त्याचा त्रास होतो, म्हणून अशा बाजारपेठांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. (प्रतिनिधी)