पाणी योजनेत गैरप्रकार; चौकशीची मागणी
By Admin | Updated: November 4, 2014 22:22 IST2014-11-04T22:22:17+5:302014-11-04T22:22:17+5:30
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पाणीपुरवठा योजनेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आश्वासन देऊन दोन महिने उलटून गेले

पाणी योजनेत गैरप्रकार; चौकशीची मागणी
गोरेगाव : माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पाणीपुरवठा योजनेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आश्वासन देऊन दोन महिने उलटून गेले तरी जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी कोणतेच पाऊल उचलले नसल्याचे दिसून येत आहे.
सुमारे २.५ कोटी रु पयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. गोरेगावमधील नळपाणी योजना खूपच खराब झाल्याने, शिवाय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा योजनेसाठी २.५ कोटी रुपयांची योजना मंजूर केली होती. त्या वेळी तात्काळ ६५ लाखांचा पहिला हप्ता गोरेगाव ग्रामपंचायतीकडे मिळाला होता. मात्र पाणीपुरवठा समितीने बँकेत खाते उघडून रक्कम वळवून घेतली आणि कंत्राटदाराला २५ लाखांचा धनादेश दिला.
मधल्या कालावधीत या योजनेची घाईघाईत काही कागदपत्रे तयार केली़ त्यामुळे अनेक कारनामे उघड झाले आहेत. गोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रवीण गोरेगावकर यांनी योजनेतील गैरकारभाराविषयी पाठपुरावा केला. त्यांनी १५ आॅगस्टला आमरण उपोषणाची नोटीस दिलेली, परंतु तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे प्रवीण गोरेगावकर यांनी त्या वेळचे उपोषण स्थगित केले. या घटनेनंतर रायगड जि. प.कडून कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत