मेट्रोखाली अनधिकृत पार्किग

By Admin | Updated: September 5, 2014 01:29 IST2014-09-05T01:29:42+5:302014-09-05T01:29:42+5:30

मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून आजतागायत अनधिकृत पार्किगची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Unauthorized parking under metro | मेट्रोखाली अनधिकृत पार्किग

मेट्रोखाली अनधिकृत पार्किग

घाटकोपर : मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून आजतागायत अनधिकृत पार्किगची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही पार्किगची समस्या आता स्थानिकांसह परिसरातून जाणा:या वाहनधारकांसाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. 
मेट्रो पुलाखालील रस्त्याला अनधिकृत पार्किगचा विळखा पडलेला दिसून येतो. दुचाकीपासून मोठमोठय़ा खासगी बसेसही मेट्रोखालीच पार्क केल्या जात आहेत. घाटकोपर तुकाराम पुलापासून अगदी साकीनाक्यार्पयत ही समस्या कायम आहे. त्यात खासगी बसचालकांच्या दादागिरीचाही स्थानिकांना नाहक त्रस सहन करावा लागत आहे. मेट्रोखाली होत असलेल्या या पार्किगमुळे रस्त्याची वाट अरुंद होऊन अपघातांचे प्रमाणही येथे वाढले आहे. अशात शाळकरी मुले आणि ज्येष्ठांना जीव मुठीत धरून या मार्गाने ये-जा करावी लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणो आह. रात्री अपरात्री संपूर्ण रस्ता बंद होतो. फक्त एखादी गाडी कशीबशी साकीनाक्याकडे जाऊ शकते, अशी भीषण परिस्थिती निर्माण होते. त्यात घाटकोपर-साकीनाका लिंक रोडवरील प्यारेलाल गॅरेजजवळ रिक्षा पार्क केलेल्या असतात व गाडय़ांचे शोरूमवालेही त्यांची वाहने चक्क रस्त्यावर आणून डिस्प्लेसाठी ठेवतात. त्यात अध्र्याहून अधिक रिक्षा रस्त्यातच पार्किग केलेल्या असतात. रस्त्यावरच गाडय़ांच्या धुण्याचे, दुरुस्तीचे कामही सर्रासपणो सुरू असते. त्यामुळे परिसरात अस्वच्छतादेखील मोठय़ा प्रमाणात पसरत आहे. 
या मार्गावरच्या अनधिकृत पार्किगवर वारंवार कारवाई करण्यात येत असल्याचे साकीनाका वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आर.के. खरात यांनी सांगितले. पण आता येथे धडक कारवाईची गरज आहे. 
तक्रारीनंतर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई होते. मात्र, परिस्थिती पुन्हा जैसे थे स्वरूपात पाहावयास मिळते. या रस्त्यावरून शाळकरी मुलेही मोठय़ा प्रमाणात जात असल्याने त्यांनाही काही वेळा अपघाताला सामोरे जावे लागले आहे. एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वीच आता कठोर कारवाईची गरज स्थानिक संजना अंकुशराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Unauthorized parking under metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.