चेंबूरच्या ईस्टर्न प्लाझा हॉटेलमधील अनधिकृत लॉज जमीनदोस्त
By जयंत होवाळ | Updated: November 30, 2023 20:15 IST2023-11-30T20:14:09+5:302023-11-30T20:15:29+5:30
कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता या हॉटेलच्या इमारतीवर १४ फूटपेक्षा अधिक उंचीचे लॉजचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.

चेंबूरच्या ईस्टर्न प्लाझा हॉटेलमधील अनधिकृत लॉज जमीनदोस्त
मुंबई : चेंबूरमध्ये वत्सलाताई नाईक नगर येथील हॉटेल ईस्टर्न प्लाझामध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम गुरुवारी पालिकेच्या ‘एम’ पश्चिम विभागाने पाडून टाकले.तळमजला अधिक दोन मजले इतके बांधकाम होते. मात्र, कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता या हॉटेलच्या इमारतीवर १४ फूटपेक्षा अधिक उंचीचे लॉजचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.
पालिकेने अग्निशमन उपाययोजनांची पाहणी केल्यानंतर हॉटेलला नोटीसही बजावली होती. त्यानंतर बांधकाम पाडण्यात आले. बुधवारी सुमारे ८० टक्के बांधकाम पाडण्यात आले. उर्वरित बांधकाम गुरुवारी पाडण्यात आले. महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ ५)हर्षद काळे आणि सहायक आयुक्त (‘एम’ पश्चिम विभाग) विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आणि अधिकारी असे ३० जणांच्या मनुष्यबळाच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी नेहरू नगर पोलिस ठाण्याने पोलीस बंदोबस्त पुरवला होता.