नवरात्रौत्सवात अनधिकृत होर्डिगबाजी

By Admin | Updated: September 28, 2014 00:55 IST2014-09-28T00:55:19+5:302014-09-28T00:55:19+5:30

आचारसंहिता सुरू असतानाही शहरात काही ठिकाणी होर्डीगबाजी सुरूच आहे.

Unauthorized hoardings in Navratras | नवरात्रौत्सवात अनधिकृत होर्डिगबाजी

नवरात्रौत्सवात अनधिकृत होर्डिगबाजी

>नवी मुंबई : आचारसंहिता सुरू असतानाही शहरात काही ठिकाणी होर्डीगबाजी सुरूच आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नवरात्र मंडळांच्या परिसरात अशाप्रकारचे होर्डिग लागले असून काही ठिकाणी त्यावर राजकीय पुढा-यांची छायाचित्रे झळकत आहेत. मात्र प्रशाननाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन होत आहे.
सण, उत्सव व राजकीय नेत्यांचे वाढदिवस असले की शहरात मोठय़ाप्रमाणात अनधिकृत होर्डिग लावले जातात. महापालिका प्रशासनही राजकीय दबावापोटी संबंधीतांवर कारवाई करत नाही. परंतु यावेळी नवरात्र उत्सवामध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय होर्डिग, बॅनर लावण्यावर र्निबध आले आहेत. महापालिका आयुक्तांन आबासाहेब ज-हाड यांनी पालिका क्षेत्रत आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व विभाग अधिका:यांना सूचना दिल्या आहेत. परंतु नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने काही ठिकाणी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. अनेक उत्सव मंडळांचे पदाधिकारी हे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. मंडळांच्या प्रवेशद्वारावर मोठय़ा कमानी उभारण्यात आल्या असून त्यावर या कार्यकत्र्याचे आणि स्थानिक नेत्यांचे फोटो लागले आहेत. शहरातील पथदिव्यांच्या खांबावरही काही जाहिराती झळकत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान अतिक्रमण विभागाचे अधिकारी व इतर कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. तर इतर विभाग अधिकारी या होर्डिगवर कारवाई करण्यास दुर्लक्ष करत असल्यानेच होर्डिग आणि बॅनर आचारसंहिता असतानाही नवी मुंबई शहरात झळकत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Unauthorized hoardings in Navratras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.