आरक्षित तिकिटांवर ‘अनधिकृत’प्रवास
By Admin | Updated: February 23, 2017 07:13 IST2017-02-23T07:13:06+5:302017-02-23T07:13:06+5:30
आरक्षित तिकिटे ही अन्य प्रवाशाला हस्तांतरित करू शकत नाहीत. तरीही काही प्रवाशांकडून

आरक्षित तिकिटांवर ‘अनधिकृत’प्रवास
मुंबई : आरक्षित तिकिटे ही अन्य प्रवाशाला हस्तांतरित करू शकत नाहीत. तरीही काही प्रवाशांकडून आपली तिकिटे अन्य प्रवाशाला हस्तांतरित केली जातात आणि त्यावरून दुसऱ्याचाच प्रवास
घडवला जातो. जानेवारी महिन्यात अशी ८२ प्रकरणे उघडकीस आली आहेत. डिसेंबर महिन्यात १४८ तर नोव्हेंबरमध्ये ७३ केसेसची नोंद झाली आहे.
आरक्षित तिकिटे अन्य प्रवाशाला हस्तांतरित करणे हा गुन्हा असून, अशा प्रवाशाला दंड किंवा जेल जावे लागते. या संदर्भात रेल्वेकडून जनजागृतीही केली जाते. तरीही अनेक प्रकरणे उघडकीस येत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईत १ कोटी ८० लाख प्रवाशांकडून ६ कोटी ५६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला, तसेच १ हजार ११४ भिकारी व फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)