उलंदू-अड डोसाई

By Admin | Updated: August 30, 2015 01:12 IST2015-08-30T01:12:07+5:302015-08-30T01:12:07+5:30

डोंबिवली पूर्वेला एक धाबा आहे. मधुबन चित्रपटगृहासमोर. सकाळी दहा ते रात्री अकरा भरपूर गर्दी. हा धाबा चुकून स्थानिक डोंबिवलीकरांच्या नावाला येतो. येथे दक्षिणी खासियतीचे शुद्ध देशी

Ulund-ad Dosai | उलंदू-अड डोसाई

उलंदू-अड डोसाई

- राजेंद्र शिखरे

डोंबिवली पूर्वेला एक धाबा आहे. मधुबन चित्रपटगृहासमोर. सकाळी दहा ते रात्री अकरा भरपूर गर्दी. हा धाबा चुकून स्थानिक डोंबिवलीकरांच्या नावाला येतो. येथे दक्षिणी खासियतीचे शुद्ध देशी तुपात बनविलेले तांदळाचे अनेक पदार्थ मिळतात. चोवीस पद्धतीचे डोसे आणि चौदा प्रकारचे उत्तप्पे तर हमखास. इथली खासियत आहे उलंदू डोसाई आणि अड डोसाई. वेल्ला अडाई, परुप्पू वडाई, केरराई वडाई, पझम वडाई, कथिरिक्काई, पाल पय्यम, कोझकट्टाई, मेदूवडा, पोंगल, प्लॅटर, कोंबोकोनम. पिणपोळी म्हणजे पिकलेल्या केळ्याची भजी. हे सगळे पदार्थ खायला इथं भरपूर गर्दी असते. मुख्य म्हणजे हे सगळे पदार्थ केळीच्या पानातूनच समोर येतात.

केळीच्या पानावरचं जेवण. आपल्यातल्या बऱ्याच मंडळींना या केळीच्या पानावरच्या जेवणाची तृप्ती आजही पुन:पुन्हा अनुभवावीशी वाटते. नुसतं जेवणच का, दक्षिणेतले इडली, डोशांसारखे गरम गरम आणि खरपूस पदार्थ या केळीच्या पानावर खायला मिळाले तर अनेकांचा जीव कसा कृतकृतार्थ होतो. या मायानगरी मुंबईच्या न सावरत्या पोटात असे किती अनभिषिक्त खाऊभक्त राहतात आणि रोज त्यांना नेमकं का, किती आणि काय खायला आवडतं; त्यासाठी ते कसे धडपडतात, यावर ज्याला पीएचडी करायची असेल तो करो बापडा. बेस्ट आॅफ लक. पण महागाईने आमच्या कांदा, डाळींना न भूतो महाग करून ठेवले असले तरी आमच्या सर्वकाळ सचिंत खिशाला किंचित परवडणाऱ्या भावात आमच्या अनावर जिभेची मुंबई होत असेल तर..? स्ट्रीटफूडला पर्याय नाही. आणि दुसरं काय आहे, आपल्या मनानं घेतलं तर अपनी अपनी दिल्ली जिसके उसके मुठ्ठी में होती हैं!
मुंबईत डोंबिवली पूर्वेला एक धाबा आहे. मधुबन चित्रपटगृहासमोर. एकदम फेमस. सकाळी दहा ते रात्री अकरा. भरपूर गर्दी मुंबईभरची! हा धाबा चुकून स्थानिक डोंबिवलीकरांच्या वाट्याला येतो. या धाब्यावर दक्षिणी खासियतीचे शुद्ध देशी तुपात बनविलेले तांदळाचे अनेक पदार्थ. चोवीस पद्धतीचे डोसे आणि चौदा प्रकारचे उत्तप्पे मिळतात. इथली खासियत आहे उलंदू डोसाई आणि अड डोसाई. वानगीदाखल ही काही भूक आणि जिज्ञासा चाळवणारी नावं. हे सगळे उत्तम चवीचे आणि पुन:पुन्हा मागून चापून खायचे पदार्थ आहेत. वेल्ला अडाई, परुप्पू वडाई, केरराई वडाई, पझम वडाई, कथिरिक्काई, पाल पय्यम, कोझकट्टाई, मेदूवडा, पोंगल, प्लॅटर, कोंबोकोनम. पिरणपोळी म्हणजे पिकलेल्या केळ्याची भजी. हे सगळे पदार्थ खायला इथं पार्सलही मिळतं. इथं तयार होणाऱ्या सगळ्या पदार्थांसाठी फक्त आणि फक्त काळी मिरी, जिरे, कोथिंबिरीपासून तयार केलेला खास असा दक्षिणी पद्धतीचाच मसाला वापरला जातो. यातल्या उलंदू डोसाईमध्ये कच्चा आणि शिजलेला तांदूळ, चणाडाळ, तुरडाळ वापरतात. अड डोसाई डाळी आणि तांदळाचे मिश्रण तंजावर स्टाईलने तयार केला जातो. केरळ आणि तामिळनाडू खाद्यसंस्कृतीच्या संमिश्रणातून निर्माण झालेल्या पालघाटी पद्धतीचं रुचकर खाणं इथं मिळतं.
डोंबिवली ही मक्तेदार नोकरदार मंडळींची अधिक आहे. त्यामुळे अहोरात्र कामावर जायची गडबड आणि त्यासाठीचा गोंधळ हा तसा सगळ्यांनाच पुजलेला. घरात माणसं म्हणजे खाणारी तोंडं जास्त. इथं एक हटके मेन्यू आहे. म्हणजे त्या बारा डोशांसोबतच दक्षिणी तडक्याचा लेमन राइस, कोकोनट राइस, चिंचेचा भात, दहीभात, सांबार भात. शिवाय पोंगल. यानेके मूगडाळ आणि तांदूळ मिश्रणाची झक्कास खिचडी. थोडक्यात स्ट्रीटफूड्सना सर्व सुखाचा झक्कास फंडा चांगला जमतो.

Web Title: Ulund-ad Dosai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.