उल्हासनगर मनपाच्या प्रा. शाळा सेमी-इंग्लिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2015 22:38 IST2015-04-27T22:38:02+5:302015-04-27T22:38:02+5:30

यंदाच्या शैक्षणिक वर्षात उल्हासनगर महानगरपालिकेने आपल्या २८ प्राथमिक शाळांना सेमी-इंग्लिश करण्याचा निर्णय घेतला आहे. प

Ulhasnagar Municipal Corporation Pvt. School Semi-English | उल्हासनगर मनपाच्या प्रा. शाळा सेमी-इंग्लिश

उल्हासनगर मनपाच्या प्रा. शाळा सेमी-इंग्लिश

उल्हासनगर : यंदाच्या शैक्षणिक वर्षात उल्हासनगर महानगरपालिकेने आपल्या २८ प्राथमिक शाळांना सेमी-इंग्लिश करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या या शैक्षणिक विकासावर व शाळांच्या पुनर्बांधणीवर सहा कोटी खर्च होणार असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिलीे.
गेल्या वर्षी सिंधी माध्यमाच्या दोन शाळा विद्यार्थी संख्येअभावी पालिकेने बंद केल्या होत्या. चालू वर्षात सिंधी व गुजराती माध्यमाच्या दोन शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा सेमी-इंग्लिश माध्यमाच्या करण्याचा निर्णय लक्षवेधी ठरत आहे. मात्र, या निर्णयामुळे पालिका शाळेतील विद्यार्थी संख्येत घसघशीत वाढ झाल्यास जागेचा प्रश्न निर्माण होणार असून त्या अनुषंगाने पालिका शाळांच्या ५० वर्षे जुन्या इमारतींचा विषय ऐरणीवर येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे शाळांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सेमी-इंग्लिश माध्यमामुळे मुलांच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहितीही लेंगरेकर यांनी दिली. गेल्या ५ वर्षांत १२ हजार विद्यार्थ्यांची संख्या ७५०० वर आली आहे. गेल्या वर्षी पालिकेने दोन कोटींच्या निधीतून मुलांना चिक्कीचे वाटप केले होते. तसेच दोन कोटींच्या विशेष निधीतून बेंचेसची खरेदी केली. मात्र, एका वर्षात त्यांची वाताहत झाली. (प्रतिनिधी)

४सेमी-इंग्लिश माध्यमामुळे मुलांच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहितीही लेंगरेकर यांनी दिली. पालिकेच्या या निर्णयामुळे शाळांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Ulhasnagar Municipal Corporation Pvt. School Semi-English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.