Join us

उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 23:02 IST

निकम पुण्याहून मुंबईला येत असताना गाडीला अपघात 

मुंबई: ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. निकम पुण्याहून मुंबईला येत असताना हा अपघात झाला. सुदैवाने निकम सुखरुप असून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. खालापूरजवळ झालेल्या या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली फुडमाॅलसमोर विशेष सरकारी वकिल अॅड उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पोलीस अधिकारी पोेंक्षे यांच्यासह अन्य एकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उज्ज्वल निकम यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना त्याच्या ताफ्यातील गाडीला (MH  01 BG 0348) अपघात झाला. यामध्ये पोलीस अधिकारी पोेंक्षे व अन्य एक जण जखमी झाले. त्यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :उज्ज्वल निकम