उज्ज्वल निकम यांची होणार चौकशी
By Admin | Updated: March 24, 2015 01:57 IST2015-03-24T01:57:45+5:302015-03-24T01:57:45+5:30
पाकिस्तानी अतिरेकी कसाबप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेल्या विधानांची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून त्यांच्याकडून खुलासाही मागविण्यात आला आहे.

उज्ज्वल निकम यांची होणार चौकशी
यदु जोशी ल्ल मुंबई
पाकिस्तानी अतिरेकी कसाबप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेल्या विधानांची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून त्यांच्याकडून खुलासाही मागविण्यात आला आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याने तुरु ंगात मटण बिर्याणी मागितलेली नव्हती. केवळ जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी तसे म्हटले होते, असे धक्कादायक विधान निकम २० मार्च रोजी जयपूर येथील दहशतवादविरोधी परिषदेत केले होते. निकम यांचे विधान दुर्दैवी असल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे निकम यांनी सोमवारी खडसे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आपण आक्षेपार्ह काही बोललो नाही, असा त्यांचा सूर होता. पण, खडसे यांनी त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याची सीडीच निकम यांच्या हातात दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याबद्दलही ते मानहानीकारक बोलले आहेत.
निकम यांनी कसाब आणि बिर्याणीवरून केलेली विधाने गांभीर्य सोडून केलेली दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याबद्दलही ते मानहानीकारक बोलले आहेत. निकम यांच्या वक्तव्याबद्दल आपण आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही निकम यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली, असे खडसे यांनी लोकमतला सांगितले.
निकम हे जळगावचे जिल्हा सरकारी वकील आणि राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील म्हणून अलिकडेच निवृत्त झाले. त्यांना २ वर्षे मुदतवाढ देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मात्र, निकम यांना मुदतवाढ दिली जाणार नाही, असे खडसे यांनी सांगितले.
निकम यांचे नो कॉमेंटस्
निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपल्या वयाला जानेवारीतच ६० वर्षे पूर्ण झाल्याने आपली सरकारी वकील पदाचा कार्यकाळ संपला आहे व मुदतवाढ मिळण्याबाबत आपण शासनाकडे विनंती केलेली नाही, असे ते म्हणाले.