उद्धव ठाकरे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

By मनोहर कुंभेजकर | Updated: March 28, 2024 17:44 IST2024-03-28T17:44:41+5:302024-03-28T17:44:59+5:30

काल सकाळी उद्धव ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहिर केली होती. छत्रपती संभाजीनगर येथून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिल्याने अंबादास दानवे नाराज होते.

Uddhav Thackeray saluted Chhatrapati Shivaji Maharaj | उद्धव ठाकरे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

उद्धव ठाकरे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

मुंबई-आज तिथीनुसार सार्वजनिक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी विलेपार्ले पूर्व पश्चिम दुर्तगती महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकरचे दर्शन घेवून त्यांना अभिवादन केले आणि त्यांची पाद्यपूजा केली.

यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी मंत्री आणि आमदार अँड.अनिल परब,आमदार सचिन अहिर,शिवसेना उपनेते डॉ.विनोद घोसाळकर, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम तसेच विविध अस्थापनातील पदाधिकारी, आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काल सकाळी उद्धव ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहिर केली होती. छत्रपती संभाजीनगर येथून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिल्याने अंबादास दानवे नाराज होते.मात्र आज ते ठाकरे यांच्या गाडीतून एकत्र येथे आल्याने त्यांची नाराजी दूर झाली अशी कुजबूज राजकीय वर्तुळात होती.

Web Title: Uddhav Thackeray saluted Chhatrapati Shivaji Maharaj