Join us  

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत आणली आधुनिकता, व्यापकता आणि आक्रमकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 3:59 AM

शिवसेनाप्रमुखांसमवेत उद्धव ठाकरे व्यासपीठावर वा कार्यक्रमांना यायचे. अबोल स्वभाव व अतिशय शांत वाटणाऱ्या हा तरुण भविष्यात शिवसेनेला सत्तेपर्यंत पोहोचवेल वा स्वत: मुख्यमंत्री होईल, असे तेव्हा कोणाला खरेही वाटले नव्हते.

- संजीव साबडेमुंबई : उद्धव ठाकरेराजकारणात आले, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा ते कसा सांभाळू शकतील, अशी चर्चा शिवसैनिकांमध्येच सुरू झाली होती. तेव्हा खरे तर बाळासाहेबांनी त्यांना वारसदार म्हणून जाहीरही केले नव्हते. शिवसेनाप्रमुखांसमवेतउद्धव ठाकरे व्यासपीठावर वा कार्यक्रमांना यायचे. अबोल स्वभाव व अतिशय शांत वाटणाऱ्या हा तरुण भविष्यात शिवसेनेला सत्तेपर्यंत पोहोचवेल वा स्वत: मुख्यमंत्री होईल, असे तेव्हा कोणाला खरेही वाटले नव्हते.पण उद्धव ठाकरे यांच्या स्वभावातील अनेक कंगोरे गेल्या २५ वर्षांत पाहायला मिळाले. संयमी व शांत आणि कणखर व आक्रमक असे दोन्ही प्रकार त्यांच्यात दिसले. सुरुवातीला त्यांचे वक्तृत्व आक्रमक नव्हते, ते कणखर बनू शकतील, असे जाणवत नव्हते. पण या साºया शंका त्यांनी खोट्या ठरवल्या आणि स्वत:ची वेगळी कार्यपद्धती संघटनेत रुजवली आणि ते करताना संघटनक्षमताही दाखवून दिली.शिवसेनेतील ज्येष्ठ नेते या तरुण उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानतील का, असाही प्रश्न तेव्हा विचारला जायचा. पण आता मनोहर जोशी यांच्यापासून लीलाधर डाके, सुभाष देसाई अशा सर्व जाणकार नेत्यांना नंतरच्या काळात उद्धव यांचे नेतृत्व मान्य करावे लागले. अर्थात सर्वांना बरोबर घेऊ न जाण्याची हातोटी ही त्यामागील कारणे आहेत.बाळासाहेबांच्या काळात शिवसेना अतिशय आक्रमक होती. शिवसैनिक प्रसंगी हिंसक होत, तशीच आंदोलने करीत. बाळासाहेबही कोणाचीच तमा न बाळगता या शिवसैनिकांचे समर्थन करीत, त्यांना आशीर्वाद देत. उद्धव यांनी सूत्रे हाती घेतली, तेव्हा परिस्थिती बदलली होती. आर्थिक उदारीकरणामुळे शिवसैनिकही मध्यमवर्गीय झाला असून, त्याच्या आशा-आकांक्षा बदलल्या आहेत, त्याने तोडफोड करणे अपेक्षित नाही, हे ओळखून उद्धव यांनीही संघटनेचे रूप बदलले. तसे करण्यासाठी संघटनेत बदल केले, तरुणांना अधिक जवळ केले.आता पूर्वीप्रमाणे लढून चालणार नाही, सतत रस्त्यावर उतरून चालणार नाही, हे ओळखून त्यांनी शिवसैनिकांना वेगळे कार्यक्रम दिले. नवा मध्यमवर्गीय तरुण आपल्या संघटनेत यावेत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्याही पुढे जाऊ न ग्रामीण भागांत शिवसेना रुजावी, यासाठी आटोकाट मेहनत घेतली. मुंबई व ठाण्यापुरती असलेली शिवसेना या मेहनतीमुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आणि वाढतही गेली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेचे नेतृत्व करू शकतील का, अशाही शंका व्यक्त झाल्या. पण साºया शंकांना उद्धव पुरून उरले.मराठी माणसांच्या हक्कासाठीमराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाºया शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी गुजराती, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय यांना शिवसेना जवळची वाटेल, अशी स्थिती निर्माण केली.याचे कारण मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद आता फारसा राहिलेला नाही आणि सत्तेचे राजकारण करायचे, तर असा वाद चालत नाही, हे त्यांनी ओळखले. परप्रांतीय व अन्य भाषकांच्या मनात शिवसेनेविषयी असलेली अढी दूर करण्याचे सर्वात मोठे काम त्यांनी केले. त्यातून संघटनेची ताकद वाढली. महाराष्ट्रात आपल्याला लहान नव्हे, तर मोठ्या भावाच्या भूमिकेतच राहायचे आहे, ही शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती, तसे स्वप्न होते. ते उद्धव यांनी पूर्ण तर केलेच, पण प्रसंगी आपण राज्याचे नेतृत्व करू शकतो, हेही सिद्ध केले.शिवसेनेचा हिंदुत्ववाद वेगळाशिवसेनेचा हिंदुत्ववाद एरवीही भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळा आहे. तो पोथ्या-पुराणात अडकणारा नसून, ओबीसी व मागासवर्गीय यांच्याजवळ झुकणारा आहे. प्रबोधनकारांचे संस्कार हे त्याचे कारण असू शकेल. पण ते लक्षात घेऊ न उद्धव यांनी संघटनेत आधुनिकता आणली. त्यामुळेच धर्मनिरपेक्ष विचार मांडणाºया काँग्रेस व राष्ट्रवादीशी जवळीक करण्यात अडचण आली नाही. केवळ सत्तेसाठीच ते जवळ गेले नाहीत, तर आपल्याला दगा देणाºयांना धडा शिकविणे, हाही त्यांचा हेतू होता. शिवसेना कधीच दगाबाजांशी समझोता करीत नाही, हेही त्यांनी दाखवून दिले. ते करताना आपल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना घेण्यात त्यांना अडचण आली नाही, याचे कारण एके काळी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या भुजबळ यांनी बाळासाहेबांशी केलेला समझोता.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराजकारण