63 आमदारांसह उद्धव मंगळवारी एकवीरेच्या दर्शनाला
By Admin | Updated: November 1, 2014 22:42 IST2014-11-01T22:42:17+5:302014-11-01T22:42:17+5:30
निवडून आलेल्या 63 नवनिर्वाचति आमदारांसोबत शिवसेनाकार्यप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2क्14 रोजी सकाळी 1क् वाजता कार्ला गडावर o्री एकविरा देवीच्या दर्शनाला येणार आहेत.

63 आमदारांसह उद्धव मंगळवारी एकवीरेच्या दर्शनाला
ठाणो: विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या निवडून आलेल्या 63 नवनिर्वाचति आमदारांसोबत शिवसेनाकार्यप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2क्14 रोजी सकाळी 1क् वाजता कार्ला गडावर o्री एकविरा देवीच्या दर्शनाला येणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित 63 आमदारांच्या स्वागताची भव्य तयारी o्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व विश्वस्त आणि कर्मचा:यांच्या वतीने करण्यात येत आहे.
गडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित 63 आमदार यांचा जाहीर सत्कार o्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे
शिवसेनाप्रमुख व 63 आमदारांच्या माध्यमातून o्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांना सोईसुविधा मिळण्याकरीता मदत होणार असून पर्ा्िकगने गडावर जाण्याकरीता उभारली जाणा:या नियोजित लिफ्टला देखील चालना मिळणार असून भाविकांना सहजतेने, सुलभतेने दर्शन मिळावे याकरीता दर्शन रांग लवकरच तयार होणार असल्याची माहिती एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते माजी आमदार अनंत तरे यांनी दिली.