उदे गं अंबे उदे...

By Admin | Updated: September 26, 2014 01:13 IST2014-09-26T01:13:48+5:302014-09-26T01:13:48+5:30

ठाणे शहरात १ हजार ३२८ ठिकाणी (सार्वजनिक व खाजगी) मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तर ३३१ ठिकाणी फोटो मांडण्यात आले आहेत

Uday Gan Ambe Uday ... | उदे गं अंबे उदे...

उदे गं अंबे उदे...

ठाणे शहरात १ हजार ३२८ ठिकाणी (सार्वजनिक व खाजगी) मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तर ३३१ ठिकाणी फोटो मांडण्यात आले आहेत. १ हजार २८७ ठिकाणी घटांची स्थापना केली आहे. ठाणे ग्रामीण परिसरात ६९६ (सार्वजनिक आणि खाजगी) मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तर ३६८ ठिकाणी फोटो मांडण्यात आले आहेत. तर २७० ठिकाणी घटांची स्थापना झाली. याशिवाय, शहरात आणि जिल्ह्यात अनुक्रमे २ आणि ४ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम होणार आहे.

पहिल्याच दिवशी शहरातील विविध मंदिरांमध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. तर पहिल्याच माळेचा पिवळा रंग असल्याने शुक्रवारी महिला, मुलींनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले पाहायला मिळाले. तर गेल्या काही दिवसांपासून शांत झालेल्या पावसामुळे गरबाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Web Title: Uday Gan Ambe Uday ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.