पोलिसांत तक्रार केल्याने दोन तरुणांवर हल्ला
By Admin | Updated: October 26, 2014 01:42 IST2014-10-26T01:42:15+5:302014-10-26T01:42:15+5:30
पोलिसांत तक्रार केल्याने दोन तरुणांवर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री वडाळा येथे घडली. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, वडाळा टीटी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांत तक्रार केल्याने दोन तरुणांवर हल्ला
मुंबई : पोलिसांत तक्रार केल्याने दोन तरुणांवर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री वडाळा येथे घडली. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, वडाळा टीटी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सायनमधील संतोषी मातानगर येथे राहणारा पलानी देवेंद्र (36) याचा काही दिवसांपूर्वी याच परिसरात राहणा:या तरुणासोबत वाद झाला होता. याबाबत पलानी याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याचाच राग मानत धरून आरोपीने त्याच्या आणखी दोन साथीदारांसह पलानीला गुरुवारी रात्री वडाळ्यातील संजय गांधीनगर येथे गाठले. या वेळी आरोपीने आणि त्याच्या साथीदाराने पलानीवर चाकूने वार केले. यात त्याचा मित्र ईश्वर देवेंद्र हा मध्ये पडला. तेव्हा आरोपींनी त्याच्यावरही वार केले. (प्रतिनिधी)