दोन वर्षाच्या मुलीचा शोध!
By Admin | Updated: May 5, 2014 15:35 IST2014-05-04T23:54:10+5:302014-05-05T15:35:07+5:30
नोकरी निमित्ताने मुंबईला राहणारे नाकते कुटुंबिय संगमेश्वरला आपल्या गावाच्या ओढीने निघाले होते, गावाकडच्या स्वप्नाने निघालेले हे कुटूंबच असे एकमेकांपासून तुटेल अशी कुणाच्याच मनात शंका नव्हती आणि अचानक त्यांच्यावर काळाने घाला केला. जयराम नाकती यांची पत्नीच या रेल्वे अपघातात मरण पावली तर नाकते हे गंभीर जखमी झाले.

दोन वर्षाच्या मुलीचा शोध!
नागोठणे : नोकरी निमित्ताने मुंबईला राहणारे नाकते कुटुंबिय संगमेश्वरला आपल्या गावाच्या ओढीने निघाले होते, गावाकडच्या स्वप्नाने निघालेले हे कुटूंबच असे एकमेकांपासून तुटेल अशी कुणाच्याच मनात शंका नव्हती आणि अचानक त्यांच्यावर काळाने घाला केला. जयराम नाकती यांची पत्नीच या रेल्वे अपघातात मरण पावली तर नाकते हे गंभीर जखमी झाले. यात त्यांची ५ वर्षाची मोठी मुलगी आणि ६ महिन्याची तान्हुली वाचली असली तरी त्यांची लाडली समृध्दी मात्र त्यांना दिसलेलीच नाही.
जयराम नाकती हे आपल्या गावाकडे बायको सुरेखा आणि आपल्या तीन मुलींसह निघाले होते, मात्र या अपघातात त्यांनी बायकोला गमावले तर स्वत: गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या अलिबाग येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची मोठी मुलगी सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, तर लहानगी सुखरूप आहे, मात्र त्यांची सव्वा दोन वर्षाची समृध्दी मात्र त्यांना दिसलेली नाही. सगळ्या इस्पितळांशी संपर्क करुनही त्यांना ती सापडलेली नसल्याने गंभीर जखमी असूनही त्यांचे डोळे मुलीच्या येण्याकडे लागले आहेत. (वार्ताहर)