एकाच रात्री दोन महिलांच्या आत्महत्या

By Admin | Updated: March 26, 2015 00:54 IST2015-03-26T00:54:25+5:302015-03-26T00:54:25+5:30

मंगळवारी रात्री दोन महिलांनी आत्महत्या केल्याच्या वेगवेगळ्या घटना शहरात घडल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही.

Two women suicides on one night | एकाच रात्री दोन महिलांच्या आत्महत्या

एकाच रात्री दोन महिलांच्या आत्महत्या

नवी मुंबई : मंगळवारी रात्री दोन महिलांनी आत्महत्या केल्याच्या वेगवेगळ्या घटना शहरात घडल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही.
वाशी व एनआरआय पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत. करावे गाव येथे राहणाऱ्या उज्ज्वला दिंडे-कांबळे (२३) या विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या केली. तिचे लग्न अकरा महिन्यांपूर्वी झाले होते. ती सासरच्या मंडळींसोबत राहत असे. मंगळवारी रात्री घरामध्ये कोणीच नसताना जाळून घेऊन तिने आत्महत्या केली. रात्री साडेनऊच्या सुमारास दीर कैलास दिंडे घरी आले असता रवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने खिडकीचे ग्रील कापून ते आत गेले. यावेळी घरातील शौचालयातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. दरवाजा उघडून पाहताच आतमध्ये उज्ज्वला जळलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू रेडकर यांनी सांगितले. तसेच उज्ज्वला यांच्या आत्महत्येचे कारणही कळलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे वाशी सेक्टर-९ येथे राहणाऱ्या गीता सावरिया (३०) या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. घरामध्ये कोणीच नसताना दुपारी साडेबाराच्या सुमारास तिने आत्महत्या केली. शेजाऱ्यांमार्फत वाशी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. (प्रतिनिधी)

Web Title: Two women suicides on one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.