अपघातात दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:07 IST2021-01-23T04:07:11+5:302021-01-23T04:07:11+5:30

मुंबई : माटुंगा येथील जे मेहता उड्डाणपुलावर भरधाव वेगामुळे दुचाकीची ट्रकला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक प्रवीण ...

Two-wheeler driver killed in accident | अपघातात दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू

अपघातात दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू

मुंबई : माटुंगा येथील जे मेहता उड्डाणपुलावर भरधाव वेगामुळे दुचाकीची ट्रकला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक प्रवीण घबक (३६) या तरुणाचा मृत्यू झाला. तो कुर्ला येथील रहिवासी होता. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात मृत तरुणाविरुद्धच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास हा अपघात घडला.

......

गेल्या वर्षभरात २०४ खंडणीचे गुन्हे

मुंबई : गेल्या वर्षभरात मुंबईत खंडणीप्रकरणी २०४ गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली. यापैकी १७९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. खंडणीविरोधी पथक सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

........................................

अपघात रोखण्यासाठी पोलिसांचा रेड सिग्नल

मुंबई : सायबर गुन्ह्यांबरोबरच रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी ट्विटर अकाउंटवरून जनजागृती सुरू केली आहे. यात रेड सिग्नल आल्यास वाहन थांबवा, दारूच्या नशेत वाहन चालवू नका, सीट बेल्टचा वापर करा, असे आवाहन करण्यात येत आहे.

.......................

Web Title: Two-wheeler driver killed in accident