दोन हजार खड्डे; 48 तास
By Admin | Updated: August 24, 2014 00:48 IST2014-08-24T00:48:45+5:302014-08-24T00:48:45+5:30
अद्यापही मुंबईत दोन हजारांहून अधिक खड्डे आहेत़ गणोश आगमन व विसजर्न मार्ग खड्डेमुक्त करण्याचा दावा प्रशासनाकडून होत आह़े

दोन हजार खड्डे; 48 तास
मुंबई : गणरायाचे आगमन पुढच्या आठवडय़ात होत आह़े मात्र अद्यापही मुंबईत दोन हजारांहून अधिक खड्डे आहेत़ गणोश आगमन व विसजर्न मार्ग खड्डेमुक्त करण्याचा दावा प्रशासनाकडून होत आह़े परंतु आपला वायदा पूर्ण करण्यासाठी पालिकेकडे केवळ 48 तास उरले आहेत़
दरवर्षीच खड्डय़ांचा त्रस असल्याने खबरदारी म्हणून बहुतांशी सार्वजनिक मंडळांनी गणोशमूर्ती मंडपात विराजमान केल्या आहेत़ तरीही ब:याच सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांच्या बाप्पाचे आगमन 29 ऑगस्टला होणार आह़े तत्पूर्वी गणरायाच्या आगमनाचा मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेला 25 ऑगस्टची डेडलाइन राज्य सरकारने दिली होती़ ही डेडलाइन सोमवारी संपुष्टात येत आह़े अद्यापही मुंबईत दोन हजारांहून अधिक खड्डे आहेत़ त्यामुळे पालिका अधिकारी आणि सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ समन्वय समितीच्या पदाधिका:यांनी शुक्रवारी रस्त्यांची पाहणी केली़ मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आह़े मात्र हे लक्ष्य पालिका दिलेल्या मुदतीत गाठेल, याची शाश्वती नाहीच़ (प्रतिनिधी)
च्पालिका अधिकारी आणि समन्वय समितीने शुक्रवारी मुंबईतील अडीचशे कि़मी़ रस्त्यांची पाहणी केली़ यावेळी खड्डे बुजविण्याचे काम युद्धतपाळीवर सुरू असल्याचे दिसून आल़े
च्मात्र अद्यापही अनेक ठिकाणी खड्डे आहेत़ त्यामुळे पालिका डेडलाईन पाळेल, अशी आशाच तेवढी करू शकतो, अशी प्रतिक्रिया समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली़
समन्वय समितीने तयार केलेल्या यादीमध्ये पेडर रोड, गुरू गोविंद सिंग रोड मुलुंड आणि शंकराचार्य क्रॉस रोड पवई, लालबहादूर शास्त्री मार्ग भांडुप, कांजूरमार्ग, नाहूर व्हिलेज रोड, मुलुंड पश्चिम, सायन-पनवेल हाय वे, वांद्रे रेल्वे स्थानक रोड, एस़व्ही़ रोड, दौलतनगर सांताक्रूझ, दुसरी सुतार गल्ली, अप्पासाहेब पेंडसे मार्ग गिरगाव, सी़पी़ टँक चौक, दोन टाकी अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे असल्याचा समन्वय समितीचा दावा आह़े