मुंबईत स्वाइनचे दोन बळी
By Admin | Updated: February 22, 2015 02:29 IST2015-02-22T02:29:59+5:302015-02-22T02:29:59+5:30
फेब्रुवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूने मुंबईत डोक वर काढले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईत स्वाइनचे सरासरी दहाच्या वर रुग्ण आढळत आहेत.

मुंबईत स्वाइनचे दोन बळी
मुंबई : फेब्रुवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूने मुंबईत डोक वर काढले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईत स्वाइनचे सरासरी दहाच्या वर रुग्ण आढळत आहेत. बाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत आहे.
विरार आणि दापोलीवरून उपचारासाठी मुंबईत आलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईबाहेरील मृतांची संख्या आता १२ इतकी झाली आहे. शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत स्वाइनचे १९ नवे रुग्ण आढळले आहेत. औषधोपचार देऊन मुंबईतील अनेक रुग्णांना यश आले आहे. पण बाहेरून येणाऱ्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असते़ त्यांच्यात गुंतागुंत वाढलेली असते. यामुळेच त्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे मत पालिकेच्या एका डॉक्टरने व्यक्त केले. विरार येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू २१ फेब्रुवारी रोजी होली स्पिरीट रुग्णालयात झाला.
या महिलेला कर्करोगाची लागण झाली होती आणि केमोथेरपीचे उपचार तिच्यावर सुरू होते. दापोली, पनवेल येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेचा शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी कस्तूरबा रुग्णालयात मृत्यू झाला.