अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक वाहने
By Admin | Updated: November 28, 2014 00:27 IST2014-11-28T00:27:28+5:302014-11-28T00:27:28+5:30
आग प्रतिबंधक यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक वाहने
नवी मुंबई : आग प्रतिबंधक यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन नवीन अत्याधुनिक वाहने दाखल करण्यात आली आहेत. ‘वॉटर टेंडर’ स्वरूपाच्या या वाहनांचा महापालिका आयुक्त आबासाहेब ज:हाड यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
आयुक्त ज:हाड यांनी या दोन्ही वाहनांतील उपकरणांची व त्यातील यंत्रणोची बारकाईने पाहणी केली व माहिती घेतली. सध्या सी.बी.डी. बेलापूर, वाशी, नेरूळ आणि ऐरोली या चार ठिकाणी महापालिकेची अग्निशमन केंद्रे आहेत. या चारही केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारीवर्ग आहे. अग्निशमन दलात सध्या तीन मिनी फायर इंजीन व दोन एक्स टाइप फायर इंजीन आहेत. त्यात आता आणखी दोन वाहनांची भर पडल्याने शहराच्या सुरक्षेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास ज:हाड यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या नवीन वाहनांमधील एक्स टाइप फायर इंजीन हे 6क्क्क् ली. पाणी क्षमता उपलब्ध करून देणारे व अद्ययावत आहे. हे वाहन नेरूळ अग्निशमन केंद्रात कार्यरत राहणार आहे. तर मिनी फायर इंजीन हे 25क्क् लीटर पाणी क्षमतेचे दुसरे वाहन सीबीडी-बेलापूर येथील अग्निशमन केंद्रात ठेवण्यात आले आहे. मिनी फायर इंजीन हे अरु ंद रस्ते व लहान जागेत सहज नेता येते. एक्स टाइप फायर इंजीन हे मोठय़ा स्वरूपाच्या आगीमध्ये उपयुक्त ठरणारे आहे. यावेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख व प्रशासनाचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, उप मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणो आणि इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एक्स टाईप फायर इंजीन हे 6क्क्क् ली. पाणी क्षमता उपलब्ध करून देणारे व अद्ययावत आहे. हे वाहन नेरूळ अग्निशमन केंद्रात कार्यरत राहणार आहे.