६० लाखांच्या कोकेनसह दोन नायजेरियन अटकेत

By Admin | Updated: April 6, 2015 04:46 IST2015-04-06T04:46:24+5:302015-04-06T04:46:24+5:30

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांना शुक्रवारी रेल्वे पोलिसांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात अटक केली.

Two Nigerians with 60 million cocaine detention | ६० लाखांच्या कोकेनसह दोन नायजेरियन अटकेत

६० लाखांच्या कोकेनसह दोन नायजेरियन अटकेत

मुंबई : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांना शुक्रवारी रेल्वे पोलिसांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी ६० लाख रुपये किमतीचे कोकेन हस्तगत केले आहे.
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी शहरात सर्वच ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. शुक्रवारी सकाळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात हे दोन नायजेरियन संशयास्पद फिरत असताना येथील रेल्वे पोलिसांना दिसले. त्यांनी या दोघांना हटकले असता दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून काही अंतरावरच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये पोलिसांना ६० लाखांचे कोकेन आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी हा माल दिल्ली येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Two Nigerians with 60 million cocaine detention