गुंजाळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक

By Admin | Updated: January 7, 2016 02:13 IST2016-01-07T02:13:03+5:302016-01-07T02:13:03+5:30

शिवसेना नगरसेवक आणि शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे

Two more arrested in connection with Gunjal murder case | गुंजाळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक

गुंजाळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक

अंबरनाथ : शिवसेना नगरसेवक आणि शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत ७ आरोपींना अटक झाली असून चार आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
गुंजाळ यांची २५ डिसेंबरला मोरिवली उद्यानासमोर काही मारेकऱ्यांनी हत्या केली होती. या प्रकरणात १३ जणांची नावे फिर्यादीत नोंद करण्यात आली. त्यातील चार आरोपी दोन दिवसांत पोलिसांना शरण आले.
तर, मंगळवारी गुड्डू वारगडे या आरोपीला अटक करण्यात आली. त्याला ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ही अटक होताच पोलिसांनी याच प्रकरणात ओंकार गायकर आणि रामदास गायकर यांनाही खोपोली येथून अटक केली आहे.
या दोन आरोपींकडून पोलिसांना काय माहिती मिळते, यावर तपासाची पुढची दिशा ठरेल. तर, सचिन गायकर, शिवदास गायकर, रूपेश सासे आणि पवन कांडेकर या आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. त्याची मुदत ११ जानेवारीपर्यंत असल्याने त्यांची कोठडी वाढवण्यासाठी पोलीस ११ जानेवारीला न्यायालयाकडे मागणी करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two more arrested in connection with Gunjal murder case