‘परे’वर आणखी दोन 15 डबा लोकल धावणार
By Admin | Updated: September 21, 2014 02:35 IST2014-09-21T02:35:51+5:302014-09-21T02:35:51+5:30
प्रवाशांची वाढत जाणारी गर्दी पाहता जास्तीतजास्त डब्यांच्या गाडय़ा चालवण्याचा प्रयत्न मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे.

‘परे’वर आणखी दोन 15 डबा लोकल धावणार
मुंबई : प्रवाशांची वाढत जाणारी गर्दी पाहता जास्तीतजास्त डब्यांच्या गाडय़ा चालवण्याचा प्रयत्न मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे. दोन्ही मार्गावर पंधरा डब्यांच्या लोकल सुरू केल्या असतानाच आणखी दोन 15 डबा लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर सुरू केल्या जाणार आहेत. 2015च्या एप्रिल महिन्यात त्या धावतील, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेमार्गावर पहिली पंधरा डबा लोकल 2012मध्ये ऑक्टोबर महिन्यात धावली. बारा डबा लोकलला तीन डबे जोडून ही पंधरा डबा लोकल सुरू केली. जलद असलेली ही लोकल चर्चगेट ते विरार या मार्गावर धावू लागली. गर्दीच्या वेळेत या दोन्ही लोकलच्या जवळपास सोळा फे:या होत आहेत. या दोन्ही गाडय़ांमधून जास्तीतजास्त प्रवासी प्रवास करीत असल्याने आणखी पंधरा डबा लोकल सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. बारा डब्यांच्या दोन लोकल गाडय़ांना प्रत्येकी तीन-तीन डबे जोडून त्या पंधरा डब्यांच्या करण्यात येतील. या लोकलच्या साधारण 25 ते 30 फे:या होतील. (प्रतिनिधी)
सध्या धावत असलेल्या पंधरा डबा लोकल जलद असून त्या चर्चगेट ते विरार या मार्गावर धावत आहेत.
एप्रिल महिन्यात सुरू केल्या जाणा:या नवीन पंधरा डबा लोकल दादर ते विरार या मार्गावरच सुरू करण्याचा विचार करीत
आहोत.
त्याचप्रमाणो विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 8च्या कामाचे विस्तारीकरण सुरू असून, मार्च 2015मध्ये हे काम पूर्ण होईल आणि एप्रिलमध्ये पंधरा डबा लोकल सुरू होतील.