Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, तीन वर्षांपासून सुरू होता अत्याचार

By मनीषा म्हात्रे | Updated: November 10, 2017 04:47 IST

घरात डांबून ठेवून मारहाण करत बापानेच पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर आळीपाळीने पाशवी बलात्कार केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना

मुंबई : घरात डांबून ठेवून मारहाण करत बापानेच पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर आळीपाळीने पाशवी बलात्कार केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना घाटकोपरमध्ये घडली. गेल्या तीन वर्षांपासून नराधम बापाकडून सुरू असलेल्या अत्याचाराला कंटाळून अखेर धाकट्या मुलीने घर सोडले. बापाने ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. तपासाअंती बुधवारी पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि मुलीच्या चौकशीत नराधम बापाच्या अत्याचाराला वाचा फुटली. विशेष म्हणजे नराधम बापाच्या अत्याचाराला वाचा फुटूनही दोघींच्या बाजूने कोणीही उभे रहिले नाही. अखेर पंतनगर पोलिसांनीच फिर्यादी बनून वडिलांविरुद्ध पॉक्सो, लैंगिक अत्याचार, मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल केला. ३७ वर्षांच्या बापाला अटक करण्यात आली आहे.घाटकोपर परिसरात नेहा (१७) आणि मीना (१८) (नावात बदल) या दोन बहिणी कुटुंबासह राहतात. अचानक काही दिवसांपूर्वी नेहा घरातून गायब झाली. आपले कृत्य समोर येईल म्हणून बाप घाबरला. त्याने नेहाचा शोध घेतला. पंतनगर पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हादाखल करून शोध सुरू केला.तिच्या मित्र-मैत्रिणींकडून मिळालेल्या माहितीवरून नेहाला ताब्यातघेतले. नेहा सापडली म्हणून पोलिसांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधला. पुन्हा त्याच नरकयातनेत जावे लागेल म्हणून तिने तिथेच हंबरडा फोडला.तो पिता नसून वैरी आहे. मुळात त्याच्याच मुळे घर सोडल्याची धक्कादायक माहिती तिने पोलिसांना दिली. आपला नराधम बाप गेल्या तीन वर्षांपासून माझ्यासह ताईवर लैंगिक अत्याचार करत आहे. तो आम्हाला घरात डांबून ठेवत, मारझोड करतो. मी याची वाच्यता केली तर ताईला ठार मारण्याची आणि ताईवर अत्याचार करताना त्याची वाच्यता केल्यास मला ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. ताई माझ्यामुळे तर मी तिच्यामुळे हा अत्याचार सहन करत असल्याचे नेहाने सांगितले.अधिक तपास सुरूनेहाच्या पाठोपाठ पोलिसांनी मीनाला विश्वासात घेतले. तिनेसुद्धा या अत्याचाराला वाचा फोडली. नेहा गायब झाल्यानंतर पोलिसांना काही सांगू नये म्हणून तिलाही धमकावले होते, अशीही माहिती समोर आली. दोघीही प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. या प्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :गुन्हाबलात्कार