पंचतारांकित हॉटेलमधून दोन लाखांची शाल चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:06 IST2021-02-24T04:06:19+5:302021-02-24T04:06:19+5:30

मुंबई : नरीमन पॉइंट येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून प्रत्येकी दीड ते दोन लाख किमतीच्या ९ शाल चोरीला गेल्याचा धक्कादायक ...

Two lakh shawls were stolen from a five-star hotel | पंचतारांकित हॉटेलमधून दोन लाखांची शाल चोरीला

पंचतारांकित हॉटेलमधून दोन लाखांची शाल चोरीला

मुंबई : नरीमन पॉइंट येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून प्रत्येकी दीड ते दोन लाख किमतीच्या ९ शाल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

हॉटेलच्या विक्री केंद्रातून १९ फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ठगांनी हॉटेलच्या विक्री केंद्रातून दीड ते दोन लाख किमतीच्या ९ शाल खरेदी केल्या. तसेच पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली त्यांनी फसवणूक केली. सुरुवातीला पैसे ट्रान्सफर झाल्याचा संदेश त्यांना दाखवला. मात्र प्रत्यक्षात पैसे ट्रान्सफर झाले नव्हते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळेपर्यंत ठग पसार झाले होते. अखेर हॉटेलच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title: Two lakh shawls were stolen from a five-star hotel