सुकेळी गावाजवळ अपघातात दोन ठार

By Admin | Updated: May 11, 2015 01:43 IST2015-05-11T01:43:13+5:302015-05-11T01:43:13+5:30

नागोठणे हद्दीतील सुकेळी गावानजीक मोटारसायकल व टँकरच्या झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. रविवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुकेळी गावानजीक ही घटना घडली

Two killed in an accident near Sukreli village | सुकेळी गावाजवळ अपघातात दोन ठार

सुकेळी गावाजवळ अपघातात दोन ठार

नागोठणे : नागोठणे हद्दीतील सुकेळी गावानजीक मोटारसायकल व टँकरच्या झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. रविवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुकेळी गावानजीक ही घटना घडली.
जिंदाल कंपनीच्या चढावावर मुंबईकडून कोलाडकडे जाणाऱ्या मोटारसायकलने समोरून येणाऱ्या वाहनाला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक प्रथमेश प्रभाकर जाधव (२०, रा. परेल, मुंबई) हा जागीच ठार झाला व त्याच्या मागे बसलेला त्याचा भाऊ प्रसाद प्रभाकर जाधव (२४) हा गंभीर जखमी झाला. त्याला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना केले असता पेणच्या दरम्यान त्याचेही निधन झाले. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. बी. पाटील व हे. कॉन्स्टेबल नंदू शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)

अपघातात एक ठार
च्बिरवाडी : महाड एमआयडीसीतील कुसगाव फाटा छोटा हत्ती टेम्पोने दोन मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये तिघे जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली होती. यातील जखमी अनिल नारायण गांधी यांचा मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे.
च्एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातप्रकरणी टेम्पोचालक मंगेश सीताराम सावंत (३५, रा. गोरेगाव) याला पोलिसांनी अटक केली होती. चालकाविरोधात गुन्हा दाखल केला नसून मुुंबई येथील जे. जे. रुग्णालयातून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर सावंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी अधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Two killed in an accident near Sukreli village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.